Amravati Lok Sabha Result 2024 :  अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha Result) मतदारसंघातून नवनीत राणा पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पहिल्या कलामध्ये आघाडी मिळाली आहे. पहिल्या कलामध्ये 9.30 वाजेपर्यंत बळवंत वानखडे यांना 43388 मते मिळाली आहेत. 


नवनीत राणा (Navneet Rana) भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर महाविकासआघाडीकडून काँग्रेसचे दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) मैदानात उतरले.  आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करत प्रहार कडून दिनेश बुब (Dinesh Bub) यांना मैदानात उतरवत तिरंगी लढत केली. अमरावतीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेय. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. पण त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय होणार ? याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागलेय.  






कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Amravati Lok Sabha Voting Percentage 2024)
यंदा अमरावती लोकसभा मतदारसंघात  26 एप्रिल रोजी 63.67 टक्के मतदान झाले.
बडनेरा - 55.78 टक्के
अमरावती - 57.52 टक्के 
तिवसा - 64.14 टक्के 
दर्यापूर - 66.88 टक्के
मेळघाट - 71.55 टक्के
अचलपूर - 68.84 टक्के 


सकाळी 9.30 वाजता - कोण आघाडीवर?


सुप्रिया सुळे- 11,532 मतांनी आघाडी
राजाभाऊ वाजे- नाशिक ठाकरे गट- 30 हजार 486 मतांनी आघाडीवर
भास्कर भगरे - नाशिक 1200 मतांनी आघाडीवर
नारायण राणे - भाजप 1300 मतांनी आघाडीवर
अमोल कोल्हे- शरद पवार गट- 11,111 आघाडी
धैर्यशील मोहिते- मविआ - 8500 
रावसाहेब दानवे- 1600 मतांनी आघाडी
यामिनी जाधव - शिंदे शिवसेना
प्रतापराव जाधव - बुलढाणा 2328 मतांची आघाडी
गोवल पाडवी - काँग्रेस 32 हजार मताने आघाडी
सुनिल तटकरे - राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी


कोण पिछाडीवर? 
नवनीत राणा
सुनेत्रा पवार 
रामदार तडस


तिहेरी लढतीमुळे अमरावतीची निवडणूक चर्चेत



अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा या 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हनुमान चालीसा प्रकरणामुळे राणा दाम्पत्य चर्चेत आलं. त्यातच नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा निकाल देखील न्यायालयात प्रलंबित होता. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या दाट चर्चा होत्या आणि  झालंही तसंच. त्यामुळे बच्चू कडू यांच्याकडून नाराजीचे सूर उमटू लागेल. त्यातच शिंदेंसोबत गेलेल्या बच्चू कडू यांनी अमरावतीच्या लोकसभेच्या मैदानात त्यांचा उमेदवार उतरवला. त्यामुळे अमरावतीची ही निवडणूक काहीश्या नाराजीच्या वातावरणाभोवती फिरल्याचं पाहायला मिळालं.