Madha Lok Sabha Election 2024 : सोलापूर : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये मोठी चुरस रंगणार आहे. याचं कारण म्हणजे, महाराष्ट्रातील (Maharashtra News) दोन मोठे पक्ष म्हणजे, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अंतर्गत फूट. या फुटीमुळे राज्याच आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. अशातच राज्यातील अनेक मतदारसंघाच प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे. यापैकी एक म्हणजे, माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency). गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यात उमेदवारीचा तिढा कायम आहे. भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यामुळे मोठं नाराजी नाट्य समोर आलं. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी माढ्यासाठी त्यांच्या मनातील उमेदवाराचं नाव सांगितलं आहे. 


माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे निर्माण झालेली नाराजी अद्याप कमी होताना दिसत नाही. माढ्यात मोहीते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर हा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही. अशातच भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे माढ्यात मोठं नाराजी नाट्य अजूनही सुरूच आहे. अशातच शरद पवारांनी आता माढ्यातून कोणी लोकसभा निवडणूक लढवावी हे सांगितलं आहे. माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे, असं शरद पवार आज बारामतीत बोलताना म्हणाले. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


माढ्याच्या जागेसाठी शरद पवारांच्या मनातील उमेदवार कोण?


माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे. मात्र सगळ्यांनी ऐकली पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. आमच्याकडे आणखी लोक येतील, महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसं येतील, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच, यावेळी बोलताना यापुढे आपण कधीच निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. आपण माढातून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.  


माढ्याची जागा शरद पवार लढवणार? 


राज्याच्या राजकारणाबाबतही शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपण माढातून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माढातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. अशातच आता स्वतः शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देत, मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. 


पाहा व्हिडीओ : Sharad Pawar : "मी स्वत: निवडणूक लढवणार नाही" अखेर लोकसभेच्या चर्चांना पूर्णविराम



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही? शरद पवारांनी सस्पेन्स संपवला