मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असली तरी महाराष्ट्रातील 48 मधील असे काही मतदारसंघ आहेत. जिथे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) पक्षाला जरी जागा सुटल्या असल्या तरी, त्या-त्या पक्षांना काही मतदारसंघात (Lok Sabha Constituency) उमेदवार मिळत नाहीय. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यास उशीर लागत आहे. तर काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी एकाच लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Constituency) एकापेक्षा अधिक उमेदवार आग्रही आहेत त्या ठिकाणी सुद्धा पेच निर्माण झाला आहे. 


कुठल्या पक्षाला, कुठल्या मतदारसंघात उमेदवार मिळेना?


काही ठिकाणी अजूनही  एखादा लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाने लढवावा यावर एक मत होत नाही. कुठल्या पक्षाला कुठल्या लोकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवार मिळत नाहीये किंवा उमेदवार निश्चित होत नाहीय.


शिवसेना ठाकरे गट



  • कल्याण

  • हातकणंगले

  • उत्तर मुंबई


शिवसेना शिंदे गट



  • ठाणे

  • उत्तर पश्चिम मुंबई

  • संभाजीनगर

  • यवतमाळ वाशीम

  • दक्षिण मुंबई

  • नाशिक


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष



  • माढा

  • रावेर

  • सातारा


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट



भाजप



  • उत्तर मध्य मुंबई

  • दक्षिण मुंबई

  • ठाणे

  • संभाजीनगर


काँग्रेस



  • उत्तर मध्य मुंबई

  • जालना


देशात 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका


देशात एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार असून महाराष्ट्रात (Maharashtra News) पाच टप्प्यात निवडणुका होतील. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून यादरम्यान मतदान पार पडणार आहे. तर 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल लागेल. 


महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक


महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. 



महत्त्वाच्या इतर बातम्या :


महायुतीत शिवसेना नाराज? भाजप मित्रपक्षांना संपवतंय, सर्व्हेच्या नावाखाली फसवतंय; शिंदेंच्या माजी मंत्र्याचा हल्लाबोल