Rupali Patil Thombare on Ravindra Dhangekar, Pune : पुण्यात पोर्शे कारने (Pune Accident) दोन तरुणांना उडवून जीव घेतल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला. राजकीय नेत्यांकडूनही या प्रकरणावर आवाज उठवण्यात आला. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. शिवाय त्यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले होते. दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हात पाय बांधून पळायला लावलं, अशी टीका केली होती. रवींद्र धंगेकर यांच्या टीकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली ठोंबरे यांनी धंगेकरांना प्रत्युत्तर देण्यासाठी फेसबुक पोस्ट केली आहे. 


काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे? 


रुपाली पाटील ठोंबरे लिहितात, आमदार रवी भाऊ धंगेकर, फडवणीस साहेबांनी अजित दादांचे हातपाय बांधले,असे तुम्ही बोलून गेलात पण तुम्हाला आठवण करून दयायची आहे. हे तेच अजित दादा आहेत,जे महविकास आघाडी मध्ये असताना ज्यांनी तुमच्या आमदारकीचा हात पाय झटकून,तन, मन,धनाने जोरात काम केले,आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जोमात काम करायला सांगितले. अजितदादा सुशिक्षित,प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले कर्तव्यदक्ष काम करणारे नेते आहेत. आता दादा महायुतीत आहे हा तुमचा त्रास आहे.


पुढे लिहिताना ठोंबरे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री,गृहमंत्री मा.फडवणीस साहेब आहेत आणि दादा उपमुख्यमंत्री व पुणे पालकमंत्री. पुण्यात ज्या अल्पवयीन मला कडून नशापणी करत अपघात घडला त्यात दुर्देवी दोन तरुण मुलांचा मृत्यू झाला,भयाण आणि धक्कादायक घटनेने पुणे हादरले. त्यात खुद त्या खात्याच्या प्रमुखाने,गृहमंत्री यांनी पोलीस आयुक्तालय इथे येवून कडक कारवाईचे आदेश दिले,कर्तव्यात कसूर केलेल्या पोलिसांना निलंबन केले. महायुतीचे सरकार असल्याने अजित दादा आणि फडवणीस साहेब यांच्यातील समन्वय,संवाद एकत्र काम करण्याची दोघांची शैली तुम्ही पाहताय.याचा जास्त वेदना होत आहे याची जाणीव आहे आम्हाला.



नुसते राजकीय स्टंट नकोत, त्यामुळे कामाची दिशा भरकट जाते


गृहमंत्री यांनी कारवाई आदेश दिले म्हणजे पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून एकत्रित निर्णय केला असा असतो, तो भाऊ तुम्हाला समजत नसेल किंवा समजून सुद्धा फक्त विरोधक आहात म्हणून घडलेली घटना गुन्हा, केस न समजता विरोधक म्हणूनच टीका करत आहात. जरा आपले पुणे आपली युवा पिढी,चांगले लोकप्रतिनिधी बनून पुणे वाचवू या आणि घडवू या. नुसते राजकीय स्टंट नकोत. त्यामुळे कामाची दिशा भरकट जाते. रवी भाऊ तुम्ही केलेल्या विधानाचा जाहीर निषेधच, असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Rain Update : फळबागा भुईसपाट, वीज पडून दोघांचा मृत्यू; सोलापूर, लातूर, माढ्यासह वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची बॅटींग