Kunal Sarmalkar on Aaditya Thackeray :  स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने मुंबईतील खारमधील शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं गायलं. कुणालनं गायलेल्या गद्दार नजर वो आए... या गाण्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी थेट खारमध्ये ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पडला, त्या ठिकाणी जात स्टुडिओची तोडफोड केली.   यावरून ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कामरा यांनी गायलेलं गाणं 100 टक्के खरे होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न केला, असा हल्लाबोल केला होता. आता यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे वांद्रे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर (Kunal Sarmalkar) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

कुणाल सरमळकर म्हणाले की, अरे शेंबड्या, तुमचे सरकार असताना काय दिवे लावले होते? तुम्ही लोकांना राजरोज अटक करत होतात, मारत होतात, तुमच्यासाठी आमच्यासारखे सामान्य शिवसैनिक रस्त्यावर होते. कधी एखादी चापट खाल्ली आहेस का? तू कोण सांगणार? आणि सगळ्यात महत्त्वाचे बाळासाहेबांचा अपमान करणारी बाई तुमच्या पक्षात आली तेव्हाच का नाही थोबाड उचकलं? तेव्हाच तुमची लायकी कळाली. स्वतःच्या आजोबांच्या इज्जतीपेक्षा सत्ता आणि लाचारी प्यारी वाटते तुम्हाला तुम्ही कोण लॉ आणि ऑर्डरवर बोलणार? आता Night लाईफ सुरू झाली असेल नाही का? असा हल्लाबोल त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलाय. 

नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे? 

कुणाल कामरा प्रकरणावरून आदित्य ठाकरे एक्सवर पोस्ट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, विनोदी कलाकार कुणाल कामराने जिथे एकनाथ मिंधेंवर गाणं सादर केलं तो कॉमेडी शोचा स्टेज मिंधेंच्या भ्याड टोळीने तोडला. जे गाणं १०० टक्के खरे होते. एखाद्याच्या गाण्यावर फक्त एक असुरक्षित भ्याडच प्रतिक्रिया देईल. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे का? एकनाथ मिंधे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न केला, अशी टीकाही त्यांनी केली होती.

आणखी वाचा 

Sanjay Raut : महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभला, कुणाल कामरा प्रकरणावर राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ही गांXXX