kulgaon badlapur nagar parishad Election: महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वपार चालत आलेली घराणेशाहीची परंपरा अलीकडच्या काळात आणखीनच जोमाने वाढताना दिसत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या (Local Bodies Election) निमित्ताने याचे पुन्हा एकदा प्रत्यंत्तर येताना दिसत आहे.  राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये सर्वच पक्षाच्या राजकारण्यांकडून आपापल्या घरातील सदस्यांना मोठ्याप्रमाणावर उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, कुळगांव बदलापूर नगरपरिषदेत (kulgaon badlapur nagar parishad) याचा कळस गाठला गेला आहे. कुळगांव बदलापूर नगरपरिषदेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून एका घरातील दोन-तीन नव्हे तर सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांचे स्थान फक्त सतरंज्या उचलण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे का, या शंकेने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

Continues below advertisement

शिंदे गटाचे बदलापूर शहर शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे  यांच्या घरातील सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे. वामन म्हात्रे (Waman Mhatre) यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भावजई, भाचा अशा एकूण एकाच घरातील 6 जणांना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे. वामन म्हात्रे यांचा भाऊ  तुकाराम म्हात्रे, भावजय उषा म्हात्रे,  मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांना नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. 2015 मध्ये सुध्दा वामन म्हात्रे यांच्या परिवारातील 4 जणांना महापालिकेची उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेनेच्या तिकीट वाटपानंतर बदलापूरमधील भाजप नेत्यांनी या सगळ्या प्रकारावर टीकास्त्र सोडले आहे. यावर आता एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नेते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

BJP Nanded News: भाजपकडून लोहा नगरपरिषदेत एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आतापर्यंत काँग्रेसमधील गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीवर अनेकदा टीका करण्यात आली आहे. मात्र, घराणेशाहीच्या या राजकारणात यंदा भाजपही मागे राहिलेला नाही.  नांदेड (Nanded) जिल्हातील लोहा नगर परिषदेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने (BJP) चक्क एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे. लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली आहे. 

आणखी वाचा

रेती माफियांना पक्षात घेतलं, भाजप पक्षश्रेष्ठीविरोधात आशिष देशमुखांची नाराजी; थेट सत्याग्रहाला बसण्याचा इशारा, तात्काळ पक्षप्रवेशाला स्थगिती