Kinwat Vidhansabha Election Result : किनवट विधानसभा मतदारसंघात पुन्हा कमळ फुललं आहे. भाजपचे भीमराव रामजी केराम यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदिप नाईक यांचा पराभव केला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे. बहुतांश जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
2019 च्या निवडणुकीत काय स्थिती होती?
किनवट विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. लोकसभेला हा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किनवट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे भीमराव रामजी केराम (MLA Bhimrao keram) 89,628 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदिप हेमसिंग नाईक (Pradeep Naik) यांचा परभाव केला होता. जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रदीप जाधव हे विजयी झाले होते. तर त्यावेळी अपक्ष असलेले भीमराव रामजी केराम यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांचा पराभव झाला होता.
यावेळी नेमकं काय होणार?
दिवाळीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत पुढच्या काही दिवसातच आचासंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्वच मतदारसंघात हालचालींना वेग आला आहे. किनवट मतदारसंघात नेमकं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. यामध्ये पुन्हा मागील वेळेचे उमेदावरच आमने-सामने येण्याची शक्यता आहे. भाजपकडून पुन्हा भीमराव रामजी केराम हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रदिप हेमसिंग नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळ मैदान जुने आणि खेळाडू देखील जुनेच आहेत. मात्र, यावेळी भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर शरद पवार गटाला पाठिंबा वाढत आहे. या स्थितीत प्रदिप नाईक हे शरद पवार यांच्यासोबत कायम आहेत.
लोकसभा निवडणुकीत नेमकं काय झालं?
लोकसभा निवडणुकीत किनवट विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो. यावेळी या मतदारसंघातून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत किनवट मदरासंघातून नागेस फाटील आष्टीकर यांना मताधिक्क्य मिळालं आहे.
किनवट मतदारसंघात अनेक प्रश्न
किनवट हा एकमेव आदिवासी बहुल असलेला मतदारसंघ आहे. यावेळी येथील मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विदर्भ व तेलंगणाच्या सीमेवरील किनवट मतदारसंघ एकेकाळी राज्यात गाजला. मराठवाड्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला हा मतदारसंघ आहे. येथे नैसर्गिक संपत्ती विपुल प्रमाणात जिल्हा मुख्यालयापासून लांब असल्याने स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीनेही हा भाग दुर्लक्षित राहिला. जंगलांचीही अपरिमित हानी झाली. किनवटला उपजिल्हा रुग्णालय असले तरी अत्यवस्थ रुग्णांना यवतमाळ किंवा आदिलाबादला हलवावे लागते. माहूरला निवासाच्या व्यवस्था नाहीत. लालूप्रसाद यादव यांनी माहूर-किनवट या रेल्वे मार्गाला मान्यता दिली. परंतु तो कागदावरच आहे. या भागाचे औद्योगिक मागासलेपण कायमच आहे. या मतदारसंघात सागाचे लाकूड प्रसिद्ध आहे.या मतदारसंघात रोजगाराचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या:
विधानसभेची खडाजंगी: नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती काय? कोणत्या पक्षाचे किती आमदार? सविस्तर माहिती एका क्लिकवर