ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची एकूण संपत्ती 7 कोटी 50 लाख 64 हजार 927 रुपये असल्याचे जाहीर केले आहे. 2019 साली शिंदे यांनी शिवसेनेकडून कल्याण लोकसभेची निवडणूक लढविली होती. 2019 सालच्या तुलनेत गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 5 कोटी 54 लाख 48 हजार 412 रुपयांची वाढ झाली आहे.
2019 मधील एकूण मालमत्ता-1,96,16,515
पत्नी वृषाली शिंदे -5267000
रोख रक्कम -150000
कर्ज आणि दायित्व -12,41, 233
गुन्हे -नाही.
वाहने-नाही.
विमा- 46,00,000
शिक्षण-एमबीबीएस.
2024 मध्ये एकूण मालमत्ता-75064927
पत्नी वृषाली शिंदे -3,35,43,885
रोख रक्कम -3,99,021
कर्ज -1,77,36550
गुन्हे -नाही.
वाहने-नाही.
शेत जमीन- 2 काेटी 71 लाख रुपये बाजारमूल्य असलेली शेतजमीन सातारा जिल्ह्यातील दरे गावात आहे. पत्नीच्या नावे सिंधूदुर्ग जिल्ह्यात 4 कोटी 6 लाख रुपये बाजारमूल्य असलेली शेत जमीन आहे.
दागिने-स्वत:कडे 11 लाखाचे सोने, चार लाख 97 हजाराची हिऱ्याची अंगठी, 1 लाख 10 हजार रुपयांचे घड्याळ, पत्नीकडे 22 लाख रुपयांचे सोने, 7 लाखाची अंगठी, 3 लाख 44 हजार रुपये किमतीची दोन घड्याळे, 1 लाख 63 हजार रुपयांची चांदी आहे.
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत 23 लाखांची वाढ
कल्याण लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे उद्वव सेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची एकूण संपत्ती 26 लाख 97 हजार 86 रुपये असल्याचे जाहीर केले आहे. 2009 साली दरेकर यांनी मनसे पक्षाकडून कल्याण लोकसभेची निवडणूक लढविली होती. 2009 सालच्या तुलनेत गेल्या पंधरा वर्षात 23 लाख 12 हजार 996 रुपयांची वाढ झाली आहे.
2009 मधील एकूण मालमत्ता
एकूण संपत्ती -3,84,090
पती सचिन राणे -21, 95,750
रोख रक्कम -5 हजार रुपये
वारसा हक्क - नाही.
कर्ज -नाही
गुन्हे -नाही
वाहने-स्वत:चे वाहन नाही, पतीकडे दुचाकी वाहन
बँकेत 1 हजार 211 रुपये होते.
शेअर्स नाही.
3 लाख 84 हजार रुपये किंमतीचे 27 तोळे सोने हाेते.
सदनिका पतीच्या नावे होती. त्यासाठी बँकेतून सहा लाखाचे कर्ज. तसेच अन्य एका बँकेतून दीड लाखाचे कर्ज.
सदनिका- डोंबिवली,पाथर्ली येथे पतीच्या नावे
शिक्षम- डबल ग्रॅज्युएट
----------
2024 मध्ये एकूण मालमत्ता
एकूण संपत्ती -26,97,086
पती सचिन राणे -13,02,174
मुलाचे नावे-1,85,234
रोख रक्कम 3,00,000
वारसा हक्क - नाही.
कर्ज -नाही
गुन्हे -दाेन राजकीय गुन्हे
वाहने- स्वत:कडे दोन दुचाकी आहेत. पतीकडे एक चार चाकी आणि एक दुचाकी
शेतजमीन-महाड आणि पालघर येथे शेतजमीन
सदनिका-पार्थली येथे पतीच्या नावे
हेही वाचा :