ठाणे : राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) आठ महिन्यातच कोसळला. यामुळे महाराष्ट्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आता पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे (Jaydeep Apte) याला पोलिसांना अटक केली. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पोलिसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. 


26 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. तेव्हापासून जयदीप आपटे फरार होता. पोलिसांनी जयदीप आपटे याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी केली होती.  बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटेला (Jaydeep Apte) कल्याणमधील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. आता यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिकिया येत असून जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. 


अचानक पोलिसांना कळलं दूध गरम झालं अन्...


जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपटे घराच्या बाहेर बायकोला भेटायला येणार, पोहे पण बनवलेले होते, चहा पण बनवलेला होता. सगळं झालं होतं, मग अचानक पोलिसांना कळलं दूध गरम झालं आहे. मग पोलीस पोहचले आणि मग अटक करण्यात आली, असे म्हणत त्यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. 


महाराष्ट्राची मान देशभरात खाली गेली


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणात कुणालाही सुटका नाही. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. विरोधकांना आम्ही चपराक लगावली आहे, असे म्हटले होते. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, आपटेचा अनुभव काय? त्याची डिग्री काय? त्याला पुतळा कोणी बनवायला दिला? काय चौकशी करणार? पुतळा निष्क्रिय कारभारामुळे पडला आता कोणाची चौकशी करणार बोलणाऱ्यांची? पुतळा काय आम्ही पाडला का महाराष्ट्राची अख्या देशभरात मान खाली गेली त्याच्याबद्दल बोला, राजकारण करतात मग येवढे वर्ष तुम्ही काय करतात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


मतांच्या व्यापारासाठी धावपळ


राज्याच्या महसूल व वन विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना दिला जाणारा मदत निधी बंद केला. याबाबत विचारले असता जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 300 ते 400 कोटी तुम्हाला जाहिरातीसाठी खर्च करायला आहेत. माझी लाडकी बहीण योजनेसाठी दौरे काढायला पैसे आहेत. विमानाने फिरायला पैसे आहेत. मीटिंग घ्यायला पैसे आहेत आणि जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत. ज्यांचं कुटुंब त्या पैशावर चालतं त्यांचे पैसे तुम्ही बंद करून टाकले. तिथे आया बहिणी नाहीत का? तिथे मुलं बाळ नाहीत का? सरकारला संवेदना नाहीच आहे. मतांच्या व्यापारासाठी ही धावपळ सुरु आहे.  मत मिळणार नाहीत, आपलं काही खरं नाही हे समजल्याने सगळ्या डिपार्टमेंटचे पैसे कट करत आहेत. मागासवर्गीयांचे पैसे कट केले, मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिपचे पैसे कमी केले. तीन हजार रुपयात तुम्ही लाडक्या बहि‍णींचे मत विकत घेऊ शकत नाही. लोकशाहीत लोक तुमची पैसे घेतील पण तुम्हाला मत देणार नाहीत, असे टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. 


आणखी वाचा 


Jaydeep Apte: बायकोनेच जयदीप आपटेचा गेम केला, निशिगंधा आपटेंनी पोलिसांना टीप दिली अन् लपाछपीचा खेळ संपला