पंढरपूर: उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील पक्षाची लाईनच सोडल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या (OBC) गळ्यातील ताईत होता. मात्र संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दावणीला नेऊन बांधल्याने वर्षानुवर्षे सोबत असलेला ओबीसी समाज शिवसेनेपासून दूर गेला. एकेकाळी 75 आमदार निवडून आणणाऱ्या सेनेवर आज किती वाईट वेळ आली, हे समोर दिसत असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सांगितले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शरद पवार यांची साथ सोडून पुन्हा शिवसेनेची मूळ लाईन पकडल्यास त्यांना सोन्याचे दिवस येतील, असा दावाही लक्ष्मण हाके यांनी केला आहे. 

तसे झाल्यास शिवसेना पुन्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला भवितव्य नसल्याचा दावाही हाके यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेची मूळ लाईन घेतल्यास दूर गेलेला ओबीसी समाजही पुन्हा त्यांच्याकडे परतू शकेल, असेही हाके यांनी सांगितले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा शब्द म्हणजे देशात भूकंप असायचा. त्यांनी कधीही जात-पात विचारली नाही आणि सर्वसामान्य बहुजनांना ताकद देण्याचे काम केले. यामुळेच राज्यातील अठरापगड जाती या शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या. ओबीसी समाज ही शिवसेनेची ताकद होती. मात्र, संजय राऊत यांनी शिवसेनेला शरद पवार यांच्या दावणीला बांधल्याने राज्यातील ओबीसी समाज शिवसेनेपासून दूर गेला. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी मूळ लाईन पकडल्यास त्यांना भविष्यात खूप चांगली दिवस येतील, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. 

देवेंद्र फडणवीस उत्सुक नसले तरी मोदी-शाहांनी निर्णय घेतल्यास सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील: गोपीचंद पडळकर

सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री व्हायचे आहे. तर जयंत पाटील आणि रोहित पवारांना राज्यात मंत्री व्हायचे आहे. ते आज ना उद्या मंत्री होतील. याचा फटका छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या ओबीसी नेत्यांना बसेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.  दोन राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या चर्चा जरी आज सुरू असल्या तरी ते कायम एकच होते. येत्या काळात केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्यात जयंत पाटील व रोहित पवार हे मंत्री झालेले दिसतील असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. याचा थेट फटका छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर अशा राज्यातील ओबीसी नेत्यांना बसला असून भाजपने फक्त मते मिळविण्यासाठी त्यांचा वापर केल्याचा आरोपही हाके यांनी केला. रोहित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यास फडणवीस जरी उत्सुक नसले तरी शरद पवार आणि अमित शहा, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचा निर्णय असल्याने फडणवीसही यात काही करू शकत नसल्याचा टोलाही हाके यांनी लगावला.  शरद पवार कितीही फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेत असले तरी ते शहा आणि मोदी यांचे कार्यकर्तेच आहेत, त्यांनी कोणता आव आणण्याच्या भानगडीत पडू नये, असा टोलाही शरद पवार यांना लगावला.  संजय राऊत यांनी लिहिलेल्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी पाठिंबा मिळवायला मातोश्रीवर येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या पाया पडल्याचे म्हटले आहे.  याबद्दल विचारल्यावर लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, ती परिस्थिती दहा वर्षांपूर्वीची असू शकेल. मात्र आज दोन्ही पवार अमित शहांच्या दारात किती वेळा जातात, हे महाराष्ट्राला माहिती आहे. हे पवार विमानाने जातात का अजून कशाने जातात कुठे भेट घेतात हेही महाराष्ट्र जाणतो, असा टोला हाके यांनी लगावला. तर संजय राऊत यांनी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचेही हाके यांनी म्हटले.

आणखी वाचा

कोणीही इथे स्थानिक राजकारण आणू नये, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला; खासदारांच्या शिष्टमंडळावरून मविआत मतभेद?