Hasan Mushrif ED Raids Live Updates : 12 तासांनंतर हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांची चौकशी संपली, मुश्रीफांच्या घरातून अधिकारी निघाले

Hasan Mushrif ED Raids :

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jan 2023 07:20 PM
Hasan Mushrif ED Raids Live Updates : 12 तासांनंतर हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांची चौकशी संपली, मुश्रीफांच्या घरातून अधिकारी निघाले

Hasan Mushrif ED Raids Live Updates : 12 तासांनंतर हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांची चौकशी संपली, मुश्रीफांच्या घरातून अधिकारी निघाले 

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून छापेमारीचा निषेध

Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील तसेच पुण्यामध्ये आज ईडीकडून दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली. त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या 11 तासांपासून छापेमारी सुरुच असल्याने कोल्हापुरात हसन मुश्रीफ समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या छापेमारीचा निषेध केला आहे.

Hasan Mushrif ED Raids Live Updates : कोल्हापुरात हसन मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक, समर्थकांचं आंदोलन

Hasan Mushrif ED Raids Live Updates : कोल्हापुरात हसन मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक, समर्थकांचं आंदोलन

Hasan Mushrif ED Raid : कारवाई करायची असेल तर समन्स पाठवा, बोलवा, मुलाबाळांना नाहक त्रास देणं चुकीचं : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif ED Raid : "ईडीच्या छाप्याचं कारण माहित नाही. पुण्यातील चंद्रकांत गायकवाड माझे मित्र आहेत. तसंच जावयावरील आरोप खोटे आहेत. परंतु त्यांच्याशी व्यायसायिक संबंध नाहीत. काही कारवाई करायची असेल तर समन्स पाठवा, बोलवा, मुलाबाळांना नाहक त्रास देणं चुकीचं आहे," असंही हसन मुश्रीफ म्हणाले. 

Hasan Mushrif ED Raid : संबंधित कारखान्याशी माझा संबंध नाही : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif ED Raid : "संबंधित कारखान्याशी माझा संबंध नाही. कोणतीही नोटीस न देता ईडीने छापे टाकले आहेत. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप आधीचेच आहेत, जे खोटे आहेत. यापूर्वीच्या छाप्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिली.

हसन मुश्रिफांचे व्यावसायिक पार्टनर असलेले चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावरदेखील छापेमारी सुरु

हसन मुश्रिफांचे व्यावसायिक पार्टनर असलेले चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावरदेखील छापेमारी सुरु आहे. विद्यापीठ रोडवरील वेस्टर्न कोर्ट या ठिकाणी छापेमारी सुरु आहे 

चंद्रकांत गायकवाड यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्कमधील घरात छापेमारी

 हसन मुश्रिफ यांचे व्यावसायिक पार्टनर असलेले चंद्रकांत गायकवाड यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्कमधील लाफिज लाझुली इमारतीत घरातदेखील छापेमारी सुरु आहे. ते ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट निमिटेडचे संचालक आहे. 

Hasan Mushrif ED Raid : ईडीच्या छाप्याबाबत हसन मुश्रीफ आज दुपारी दोन वाजता बोलणार

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीने छापा टाकला. या छाप्याबाबत हसन मुश्रीफ आज दुपारी दोन वाजता आपली बाजू मांडणार आहेत.

Kirit Somaiya on Hasan Mushrif ED Raids : मविआ सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी हसन मुश्रीफ यांना वाचवण्याचा प्रयत्न केला : किरीट सोमय्या

Kirit Somaiya on Hasan Mushrif ED Raids : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच ग्रामविकास खात्याचे सचिव राजेश कुमार मिना यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. एकूण 158 कोटींचा घोटाळा हसन मुश्रीफ यांनी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी बोलताना केला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुश्रीफांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे. 

Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफ संघर्ष करणारे नेते आहेत, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut On Hasan Mushrif : आपण पाहिलं आहे, याआधी अनेक लोकांना अटक देखील झाली. त्यात मी होतो, नवाब मलिक आणि अनिल देशमुख होते. हसन मुश्रीफ यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा काही लोकांची होती. सरकारमध्ये सामील झालेल्या लोकांवरील या कारवाया रद्द होतात. त्या लोकांना दिलासा मिळतो आणि विरोधी पक्षांमध्ये आहेत त्यामधील प्रमुख लोकांवर दबावाचं राजकारण केलं जातं. हसन मुश्रीफ संघर्ष करणारे नेते आहेत, लढवय्या आहेत ते संकटाशी सामना करणारे आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

पार्श्वभूमी

Hasan Mushrif ED Raids : माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif News) यांच्या कोल्हापुरातील कागलमधील आणि पुण्यातील घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून (ED) छापेमारी सुरु करण्यात आली आहे. छापेमारी होत असल्याची मुश्रीफ यांनी एबीपी माझाकडे पुष्टी केली आहे. लवकरच सर्व माहिती घेऊन बोलणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सध्या आपण घरी नसल्याची एबीपी माझाला माहिती त्यांनी दिली आहे. 


हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरु केली होती. सातत्याने त्यांच्यावर ईडीची छापे पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. सोमय्या यांनी कारखाना कार्यस्थळावर भेट दिली होती. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. आज सकाळपासून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आपासाहेब नलवडे कारखान्यामधील झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हे प्रकरण आहे. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावरून आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आपला काही संबंध नाही असं म्हटलं होतं.









माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घराला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 








मुश्रीफ आणि  प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या छाप्याची  माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला काही समजण्या अगोदरच अधिकाऱ्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला आणि छाप्यास सुरुवात केली. बंगल्याच्या चारी बाजूने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी बंदोबस्त झालेले सर्व पोलीस दिल्ली पोलिस दलातील आहेत.


यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी




 



जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागानं केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागानं छापा टाकला होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.