Gulabrao Patil जळगाव : ज्याप्रमाणे जेवणात लोणचं आहे, तेवढी इंग्रजी आपल्याला आली पाहिजे. मात्र आपल्या भाषेचा आहे तो आदर राखलाच पाहिजे. आदर्श शिक्षकांचे मुलं हे मोठ्या पदावर असतात. मात्र पुढाऱ्यांचे मुलं हे फार काही मोठ्या ठिकाणावर नसतात. राजकारणी लोकांकडे फार प्रॉपर्टी असते, मात्र आपली मुलं कशी निघाली ही आपली मोठी प्रॉपर्टी आहे. बऱ्याच शिक्षकांना शुगर , बीपी नाही. मात्र 288 पैकी 212 राजकारण्यांना बीपी शुगर आहे. जसे भारतीय जनता पार्टीवाले कोणालाही आपल्या पक्षात घेतात. तसे तुम्ही इंग्लिश मीडियमची मुलं फोडली पाहिजे, जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी घेतली पाहिजे, असा अजब सल्ला मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिला. शिक्षक दिनानिमित्य आज आयोजित जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यातील कार्यक्रमात ते बोलत होते.

Continues below advertisement

आदर्श शिक्षक घडवायचे असतील तर मराठी शाळांची पटसंख्या वाढवा- गुलाबराव पाटील

सर्वपल्ली राधाकृष्ण याच्या जयंती निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी 15 शिक्षकांची निवड झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत आता आदर्श शिक्षक पुरस्करांची संख्या कमी झाली आहे. पूर्वी 75 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जात होते. आता 15 शिक्षक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जात आहे. ही फार तफावत आहे. मात्र पुरस्कार न प्राप्त करणारे शिक्षक सुद्धा आदर्श आहे. आता आई, 5Gचा जमाना आहे. मात्र यात आमचे शिक्षक आदर्श आहे. आमच्यावर टीका होते. मात्र आदर्श शिक्षक याच्यावर कधी टीका होत नाही. गुरुजी अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. आपण आदर्श शिक्षक झालात यात आपल्या पत्नीचा वाटा ही फार महत्वाचा आहे. कारण त्याच्यामुळे आपन आदर्श शिक्षक झालात. चांगले आदर्श शिक्षक घडवायचे असतील तर मराठी शाळांची पटसंख्या वाढवा एवढी आपणास विनंती आहे, अशी प्रतिक्रिया ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.

पटसंख्या नसल्यामुळे अनेक शिक्षकांची भरती ही रखडली- गुलाबराव पाटील

मराठी शाळांची पटसंख्या टिकली तरच शिक्षक भरती होईल, पटसंख्या नसल्यामुळे अनेक शिक्षकांची भरती ही रखडली आहे. पूर्वीच्या तुलनेत आता शाळांची स्थिती चांगली आहे. आम्ही अनेक निधी शाळांसाठी देत असतो. पूर्वीचे शिक्षक हे ड्रेसकोडमध्ये असायचे, मात्र आता तशी परिस्थिती नाही. शाळेसाठी तरी आता ड्रेसकोड शिक्षकांचा असला पाहिजे. कारण गुरु हे देवाच्या स्थानी असतात. असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

Continues below advertisement

संबंधित बातमी: