Manoj Jarange: मराठा आंदोलन मनोज जरांगे यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यावर जालना पोलिसांकडून तडीपरीची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यावर बोलताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना लक्ष्य कळत चांगलीच आगपाखड केली आहे . 'मराठा आंदोलन म्हणून तुम्ही जर नोटीस देणार असाल तर अंतरवालीच नाही तर राज्यात कोणीही हे सहन करणार नाही .मला बदनाम करण्यासाठी एखाद्या वेळेस पाहुणेरावळे घेतले असतील त्यांनी ..माझी बोलती बंद करण्यासाठी हे षडयंत्र असू शकतं .मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळ धनंजय मुंडेंसारखी (Dhananjay Munde) टोळी आहे .एखादा मुद्दा मी उचलू नये म्हणून पाहुणेरावळे काढले आहेत .मला कोणी पाहुणा नाही .असं मनोज जरांगे म्हणालेत .जालन्यात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते .


जालना पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह नऊ वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केल्यानंतर जरांगे बोलत होते . दरम्यान , 'राज्यात जेसीबी लावली म्हणून लाखो गुन्हे दाखल केले आहेत .काही ठिकाणी तोफा वाजवल्या म्हणून गुन्हे दाखल केले .आता 15 तारखेपासून साखळी उपोषण सुरू होणार असून मुंबईत ग्राउंड बघायलाही जाणार आहोत असं मनोज जरांगे यांनी सांगितले . 


फडणवीसांकडे धनंजय मुंडे सारखी टोळी :मनोज जरांगे


'सरकारने माझे तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुणेरावळ्यांचं नाव तडीपारच्या यादीत घुसवले असावे .हे देवेंद्र फडणवीस यांचा षडयंत्र आहे .केवळ मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही नोटीसी देणार असाल तर अंतर्वलीच नाही राज्यातल्या कुणालाही ते सहन होणार नाही .तुमचं दुसरं काहीही असू द्या मराठा आंदोलक म्हणून हे करणं चुकीचं आहे .जाणून बुजून मराठा आंदोलन गुंतवायचे .पाहुणेरावळे गुंतवून मला विनाकारण डाग लावू नका .मला बदनाम करण्यासाठीच पाहुणेरावळे घेतले असतील त्यांनी .कुठेही गठत नाही म्हणून मुद्दाम त्यांनी असं केलं असेल .माझी बोलती बंद करण्यासाठी हे षडयंत्र असावे .फडणवीसांजवळ धनंजय मुंडेंसारखे टोळी आहे .मला कोणीही पाहुणा नाही .मराठा समाजापुढे मी आई बापाला किंमत देत नाही .असं म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनवर टीका केली .


दरम्यान 15 तारखेपासून मराठा समाज साखळी उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं .ते म्हणाले 'पंधरा तारखेपासून साखळी उपोषण सुरू होणार आहे .यासाठी मुंबईलाग्राउंड बघायलाही आम्ही जाणार आहोत .राज्यात लाखो गुन्हे दाखल झालेले आहेत .जेसीबी लावले म्हणून ,काही ठिकाणी तोफा वाजवल्या म्हणून .एका पोरांनी कमेंट टाकली तो काय माझा पाहुणा नाही .


हेही वाचा:


Manoj Jarange Patil: जालन्यात मेहुण्यावर तडीपारीची कारवाई; मनोज जरांगेंनी विषयच संपवून टाकला, म्हणाले, माझ्या बापावर जरी...