रायगड : राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीतही शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. त्याच पार्श्वभूमवीर शिवसेनेतील नेते आक्रमक झाले असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. खासदार संजय राऊत यांनी टेस्ट ट्यूब बेबी म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा जन्म झाल्याची बोचरी टीका केली. तर, उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन बाळासाहेबांचे विचार सोडल्याची सातत्याने टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंची शिवसेनाच आता काँग्रेससोबत आल्याने अंबादास दानवेंनी निशाणा साधला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरूड (Raigad) येथे शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी झाल्याचा फोटो शेअर करत अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. 

Continues below advertisement

धाराशिवच्या उमरग्यानंतर सादर आहे, शिंदे-काँग्रेस युतीचे नवे पर्व, 'द मुरुड फाईल्स' असे म्हणत अंबादास दानवेंनी शिवसेना आणि काँग्रेसची युती झाल्याचे सांगितले. शिंदेंची अंतुलेना साथ, बाण-पंजा एक साथ. एकनाथ शिंदेंजी, यंदा 'बाळासाहेबांचे विचार' खुंटीऐवजी थेट समुद्रात का मग? असा सवाल दानवेंनी उपस्थित केला. यापूर्वी उमरगाचं ट्विट केलं होतं आता मुरुडचं केलय. आमच्याकडे 25 -30 नगरपालिकेचे असे पोस्टर आहेत, जिथे धनुष्यबाण आणि पंजा एकत्र आहेत. शिवसेनेतून गद्दारी केली त्यावेळेस एकनाथ शिंदे असं म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेससोबत युती केली म्हणून आम्ही सेना सोडली. त्यावेळी तुम्हाला शिवसेना सोडायला कारण होतं. आता, त्याच काँग्रेसची युती कशी करता? तुम्ही केलं ते योग्य, आम्ही केलं तर योग्य कसं?  असा सवालही दानवेंनी उपस्थित केला. आता, दानवेंच्या या टीकेला मुरुडमधून प्रत्त्युत्तर देण्यात आलं आहे. 

दानवेंना रायगडमधून प्रत्युत्तर 

Continues below advertisement

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंसहित शिवसेनेवर निशाणा साधत मुरुडमधील काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीबाबत लागलेल्या एका बॅनरवरुन ट्विट करत टीका केली होती. त्यावरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे रायगड उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे यांनी अंबादास दानवे यांच्यावर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार योग्य पद्धतीने बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत आहेत. तुम्ही जिथे राहताय तिथे ग्रामपंचायत सदस्य निवडून येऊन दाखवा, तुम्ही प्रसिद्धीसाठी हे सगळे करत आहात, असा टोला दानवेंनी लगावला आहे. तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर बोलला नाहीत तर उजेडात येऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे वाघ आहेत, तुम्हाला जनतेने घरी बसवलं आहे, त्यामुळे तुम्ही घरीच बसा अशा शब्दात कुथे यांनी दानवेंवर पलटवार केला. 

हेही वाचा

25 जणांच्या मृत्यूनंतर थायलंडला पळालेल्या लुथरा बंधूंना दिल्लीतून अटक; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिक्रियेस नकार