Eknath Shinde On Thane Pradeep Purnekar Death Case: ठाण्याच्या मानपाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांची 29 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राचे वार करून हत्या करण्यात आली होती. प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनंतर ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधी पक्षाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. आज उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर तब्बल 15 दिवसांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. प्रदीप पुर्णेकर यांची हत्या दुर्दैवी आहे. पोलीस आयुक्तांना सदर प्रकरणी निष्पक्ष चौकशीचे आदेश दिलेले आहेत. कुठेही कोणाला मागे घातले जाणार नाही. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. (Eknath Shinde On Thane Pradeep Purnekar Death Case)

Continues below advertisement

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सुभाष उर्फ पप्या शिंदे याला 13 ऑक्टोबरपर्यंत, तर संतोष उर्फ टल्ली आणि अमित सिंग यांना 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. हत्येसाठी वापरलेले रक्ताळलेले कपडे आणि शस्त्रांचा शोध सुरू आहे. हत्येसाठी दोन पिस्तूल आणि तीन चॉपर वापरल्याचा पोलिसांचा दावा आहे. आतापर्यंत एकच पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींना पैसे पुरवणारे, शस्त्रांची व्यवस्था करणारे आणि फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांचा शोध सुरु आहे. हत्येचा कट कुठे रचला आणि आरोपींच्या बैठका कुठे झाल्या, याचा तपासही केला जात आहे. 

नेमकं प्रकरण काय? (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)

ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर 29 सप्टेंबर रोजी रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास पाच हल्लेखोरांनी शिरुन पिस्तुलमधून सात राऊंड फायर केले. त्यापैकी चार गोळ्या प्रदीप पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. पूर्णेकर यांचे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

Continues below advertisement

प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: एक तरुणी दोन मुलांसोबत खोलीत आढळली अन्...; प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट