Eknath Shinde on Uddhav Thackeray, Nagpur : "राजू पारवे यांच्यासाठी डॅाक्टरांनी सहकार्य केलं. मी कोरोना झालेला डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हा त्यांना धीर दिला. कोरना काळात डॉक्टरांनी देवदुताप्रमाणे काम केलं. मी डॅाक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले", असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. नागपूर येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 


एकनाथ शिंदे म्हणाले, खासदार कृपाल तुमाने यांना खासदारापेक्षा मोठा मान देणार आहे. लोकांना मदत करतांना कधी कधी डॉक्टरांना पैसे कमी करायला सांगावे लागले. कधी कधी आम्ही आमच्या खिशात हात घातले. डॉक्टर संघटनेच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी कृपाल तुमाने यांचे तोंड भरून कौतुक केलं. रुग्णालयतील अडचणी आम्ही कोरोना काळात दूर केल्या. जे डॉक्टर टेंशमध्ये होते तेही मला भेटलेय 


 जीवदान देणारं परमेश्वराचं रुप म्हणून डॅाक्टरांचे स्थान आहे


पुढे बोलताना शिंदे म्हणाले, साधा माणूस, दोन वेळा खासदार होऊन दिल्लीत गेलेल्या तुमाने यांना मी सांगितलं यावेळेस निवडणूक लढवायची नाही. ते तयार झाले. आता खासदारापेक्षा मोठा मान तुमाने यांना देणार आहे. जीवदान देणारं परमेश्वराचं रुप म्हणून डॅाक्टरांचे स्थान आहे. आपण ते अनुभवत असतो.  मी येताना जुपीटर रुग्णालयात फोन केला. डॉक्टरांना फी कमी करायला सांगितली. रुग्णाचे काही पैसे आम्ही देतो. मलाही दोन वेळा कोविड झाला. त्यावेळेस मला सात रेमडीसेवीर देऊन टाकल्या, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 


कोविडमध्ये अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला


डॉक्टर हा समाजाचा आधारस्तंभ आहे. जीवनदान देणारे परमेश्वराचे रुप म्हणजे डॉक्टर आहेत. कोणताही डॉक्टर पेशंट आपल्या घरी सुखरुप जावा, यासाठी प्रयत्न करत असतो. पैसे कमी करायला सांगितले तर डॉक्टर आवडीने करतो. कारण त्यांना माहिती आहे, हे खिशातून पैसे देतील. कोविडमध्ये अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला. डॉक्टर देण्याच्या अगोदर पेशंटच म्हणायचा रेमेडेसिवीर द्या. मी कोरोना काळात खूप फिरलो. मी थोडे दिवस आरोग्यमंत्री होतो, तेव्हा दुर्गम भागात गेलो. प्रत्येक ठिकाणी भेट दिली. तिथेही डॉक्टर लोक चांगलं काम करतात. ऑर्थोपिडिक सर्जन खूप आहेत, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


प्रचारासाठी भाजपची फौज! मोदी-शाह, फडणवीस अन् तावडे; 7 केंद्रीय मंत्री, 6 मुख्यमंत्री, खासदार, प्रदेशाध्यक्ष प्रचाराच्या मैदानात