नागपूर : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामधील (SRA) लाभार्थ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानपरिषदेत केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी १७ ठिकाणी एसआरए समुह पुनर्विकास प्रकल्पाच्या घोषणेसोबतच 'एसआरए अभय योजने'ला डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ, तक्रारींच्या जलद निपटाऱ्यासाठी 'एपेक्स ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटींची संख्या वाढविण्याच्या घोषणांचा समावेश आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या ओसीसाठीच्या अभय योजनेला १ वर्षाची मुदतवाढ आणि मुंबई महापालिकेच्या लिज प्लॉटवरील महापालिका कर्मचाऱ्यांनी बांधलेल्या घरांकरीता नवीन योजना करण्याची घोषणा देखील त्यांनी केली.

Continues below advertisement

Eknath Shinde : एकनाथ शिदेंनी 17 ठिकाणांची नावं सांगितली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ५० एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खाजगी, शासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर आता एकत्रितपणे झोपडपट्टी पुनर्विकास योजना करण्यात आली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील अँटॉप हिल, कृष्ण नगर आणि केतकीपाडा (बोरिवली), गोपीकृष्ण नगर (दहिसर),ओशिवरा, गोवंडी, चित्ता कॅम्प (ट्रॉम्बे), चेंबूर, टागोर नगर (विक्रोळी), विक्रोळी पार्कसाईट, भांडुप या १७ प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे हाऊसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र, मनीषा कायंदेंकडून कौतुक

राज्यपाल नामनियुक्त आमदार आणि शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी घरांचे प्रश्न मार्गी लावणारे ‘हाउसिंग मॅन’ राज्याला लाभले, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदें यांचे अभिनंदन केलं. एकनाथ शिंदे यांनी पागडीमुक्त मुंबई, सिडकोची घरे स्वस्त करण्याचे ऐतिहासिक निर्णय घेतले, असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

पागडी व सेस इमारतींच्या पुनर्विकासासाठी धोरण, फनेल झोनबाबत तोडगा, मुंबईत समूह विकासाला चालना आणि सिडकोची घरे स्वस्त करुन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाखो सर्वसामान्यांचा घरांचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावल्याचं आमदार कायंदे यांनी यावेळी म्हटलं. 

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज विधान परिषदेत सिडकोच्या घरांच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली. यानंतर आमदार कायंदे यांनी सभागृहात  उपमुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. मराठी माणूस मुंबई बाहेर जाऊ नये, हे केवळ गळा न काढता त्यावर ठोस योजना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आणली. अनेक वर्षांपासून रखडलेला फनेल झोनचा विषय, संरक्षण खात्याशी निगडीत विषयाचे गांभीर्य लक्षात घेत त्यावर सर्वसमावेशक तोडगा काढण्याचे काम उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाते तसेच आता घरांचे प्रश्न सोडवणारे एकनाथ शिंदे हे ‘हाउसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र’ आहेत, असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं.