Eknath Khadse vs Chandrakant Patil : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यामधील आरोप-प्रत्यारोप हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत. आता मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय. तर एकनाथ खडसे यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्या आरोपावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंवर खळबळजनक आरोप
एकनाथ खडसे यांच्याकडील 34 एकर जमिनीची 100 एकर जमीन कशी झाली? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर याबाबत आपल्याकडे कागदपत्राचे पुरावे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच कुरुंदकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पोलीस अधिकारी एवढ्या मोठ्या उंचीवर कोणाच्या कृपने पोहोचला? त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी आली? असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
माझ्याकडे शंभर नव्हे तर 120 एकर जमीन
तर चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपावर एकनाथ खडसे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या नावे 34 एकर जमीन आहे तर, आपल्या परिवाराकडे, माझ्या भावाकडे मिळून शंभर नव्हे तर 120 एकर जमीन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण सात वर्षांचा असल्यापासून आपल्या नावावर शेत जमिनी आहेत. चंद्रकांत पाटील यांनी अभ्यास करायला हवा, असे प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
एकनाथ खडसेंचा खोचक टोला
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, या उलट चंद्रकांत पाटील एका पोलीस हवालदाराचे चिरंजीव असताना त्यांच्याकडे एवढ्या मालमत्ता कशा असू शकतात? पन्नास खोके एकदम ओकेमधून आले तर समजू शकतो. मात्र, पोलीस हवालदाराचा मुलगा देखील मालमत्ता घेऊ शकतो हे आपल्याला मान्य आहे, असा खोचक टोला देखील एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
चंद्रकांत पाटलांकडे एवढ्या मालमता कुठून आल्या?
चंद्रकांत पाटील यांच्याकडे आताच एवढ्या मालमत्ता कुठून आल्या? हे त्यांनी जाहीर करायला हवे,असेही खडसे यांनी म्हटले आहे. तर कुरुंदकर हे आपल्या भागात पोलीस निरीक्षक होते. त्यांच्या काळात आताचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर तडीपार आणि 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी आपल्या मुलाने मध्यस्थी करत त्यांची सुटका केली होती. हे गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे आहेत, असा आरोप देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे.
आणखी वाचा
Raj Thackeray मोठी बातमी : इकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा, तिकडे मनसेचा एकमेव नगरसेवकही फुटला!