Eknath Khadse on Girish Mahajan : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघेही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर सनसनाटी आरोप केलाय. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

एकनाथ खडसे म्हणाले की, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपली प्रकाशित केली. त्यात असे म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या रंगला रात्री अशा, त्यात त्यांनी डिटेल सांगितले आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव मला माहित आहे. पण ते सांगणं उचित होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. अमित शाह यांच्याकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चा झाली. त्यावेळेस अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते. त्यांना सांगितलं की, महिला आयएएस अधिकाऱ्यांशी तुझे संबंध आहे. यावेळी महाजनांनी सांगितले की, नाही, माझे अनेकांशी कामानिमित्त संबंध आहेत. कामानिमित्त मी बोलतो. अमित शाह यांनी त्यांना सांगितलं की, तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे. रात्री एक वाजेनंतर दिवसभरात शंभर शंभर कॉल तुझे झालेले आहेत. त्यामुळे तू आता काहीही सांग. पण, तुझं सीडीआर खरं बोलतो. रोज बोलण्याचं काय कारण आहे? असे प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले", असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे अमित शाहांना भेटणार

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मला वाटते की, खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगलेल्या रात्री थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे मी देखील अमित शाहांना भेटणार आहे. अमित शाह आणि माझी भेट होतच राहते. त्यावेळी मी त्यांना विचारणार आहे की, हे खाली जे चाललं आहे ते काय आहे? असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. आता एकनाथ खडसे यांच्या आरोपावर गिरीश महाजन काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ