मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे (manikrao kokate) यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवला आहे.  माणिकराव कोकाटे (manikrao kokate) हे सद्यस्थितीत बिन खात्याचे मंत्री आहेत, माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा अजित पवार (Ajit Pawar) यांना सुपूर्द केल्याची माहित अजित पवार यांच्या कार्यालयाच्यावतीनं काल (बुधवारी, ता १७) देण्यात आली आहे. तर त्याच्याकडे असलेलं मंत्रीपद आता अजित पवारांकडे असणार आहे, अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे पुन्हा कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यांनी भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती देखील समोर आली होती, अशातच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कमबॅकसाठी आणि मंत्रिपदासाठी काही अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Continues below advertisement

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदासाठी काय अडचण ठरू शकते?

छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठाने वाल्मीक कराड याचा जामीन फेटाळल्याचा दिलेला निकाल धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदासाठी अडचण ठरू शकतो. त्याचं कारण सत्र न्यायालयाने देखील वाल्मीक कराड याचा हत्येत सहभाग असल्याचं म्हणत जामीन नाकारला होता .खंडपीठाने ही जामीन नाकारून या सर्वाचा मास्टर माईंड वाल्मीक कराडच असल्याचं अधोरेखित केलं. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे संबंध अवघ्या महाराष्ट्राला माहित आहेत ,त्यामुळे असं बोललं जातंय एकीकडे धनंजय मुंडे यांनी अमित शहांची जरी भेट घेतली असली तरी दुसरीकडे औरंगाबाद खंडपीठाचा निकाल धनंजय मुंडे यांच्या संभाव्य मंत्रिपदात अडचण निर्माण करेल अशी शक्यता अधिक आहे.

Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी धनंजय मुंडे दिल्ली दरबारी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा

दोन वर्षांची शिक्षा झालेले राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदावर वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी दिल्ली दरबारी साकडे घातले आहे. त्यासाठी मुंडे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत तर्कवितर्क केला जात आहेत. कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचेच मंत्री असून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्या जागी पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा धनंजय मुंडे यांना वाटू लागली आहे. त्यासाठी मुंडे यांनी बुधवारी तातडीने दिल्ली गाठली. संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शहांशी त्यांनी तासभर चर्चा केल्याचे समजते. या भेटीबाबत मुंडे यांनी मौन बाळगले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर मुंडे यांनी प्रकृतीचे कारण दाखवून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतरही मुंडेंनी दिल्लीत येऊन शहांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी शहांनी मुंडेंना भेट दिली नव्हती. यावेळी मात्र शहांनी संसदेच्या दालनात धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने मुंडेंचा मंत्रिमंडळातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होण्यासंदर्भात बुधवारी चर्चा तीव्र झाली.

Continues below advertisement

Dhananjay Munde: कराडचा जामीन हायकोर्टाने फेटाळला

छत्रपती संभाजीनगर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज ३ दिवसांच्या प्रदिर्घ सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी फेटाळला. सुनावणीअंती 'सदर प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याने, जामीन अर्ज मागे घेता की आदेश पारित करावा? अशी विचारणा खंडपीठाने कराडच्या वकिलांना केली. अर्जदाराच्यावतीने दिलेल्या सूचनेनुसार (इन्स्ट्रक्शन्स) त्यांच्या वकिलांनी आदेश पारीत करण्याची विनंती केली असता उच्च न्यायालयाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळल्याचे जाहीर केले.