मुंबई : धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मांनी (Karuna sharma) वांद्रे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला आहे. करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचारप्रकरणात न्यायालयाने 4 जानेवारी रोजी निकाल दिला. त्यानुसार, धनंजय मुंडेंनी (Dhananjay munde) कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आलं असून करुणा शर्मा यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्यात आदेश देण्यात आले आहे. करुणा मुंडे पोटगीसाठी पात्र असून त्यांना महिन्याला 1 लाख 25 हजार रुपये पोटगी द्यावी, याशिवाय मुलगी शिवानीला तिच्या लग्नापर्यंत महिन्याला 75 हजार रुपये द्यावे, अशी आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मांना रडू कोसळले. न्यायालयाचे मी खूप आभार मानते, आज सत्याचा विजय झाला आहे. लोकांना असं वाटतं की, कोर्टात न्याय मिळत नाही. पण, मला न्याय मिळालेला आहे, असं करूणा शर्मा यांनी म्हटलं. आता, न्यायालयाच्या आदेशावर धनंजय मुंडेंकडून बाजू मांडण्यात आली आहे.
करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचारप्रकरणी आज वांद्रे कोर्टाने निकाला दिला असून करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे, घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले. मात्र, आत्ताचा आदेश केवळ अंतरिम पोटगी देण्यासंदर्भात आहे. अर्जदाराची आर्थिक गरज लक्षात घेऊन न्यायलयाने हा निर्णय दिलेला आहे. धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारप्रकरणी दोषी असल्याचं न्यायालयाने कुठेही म्हटलं नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, धनंजय मुंडेंकडून या कोर्टाच्या निर्णायावर वकिलांमार्फत पहिली प्रतिक्रिया देण्यात आली.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून, याबाबत काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे. . केवळ अर्जदारांच्या आर्थिक गरजांच्या आधारावर हा आदेश करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपची कबुली दिली होती, ज्याच्या आधारावरच न्यायालयाने हा आदेश दिला आहे, असे वकील सायली सावंत यांनी माध्यमांना दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामध्ये, त्यांनी न्यायालयाच्या आदेशातील पॅराग्राम 25 चा दाखला देखील दिला आहे. दरम्यान, जानेवारी 1998 मध्ये धनंजय मुंडेंसोबत माझं लग्न झालं असून मला एक मुलगा व एक मुलगी असल्याचा दावा करुणा शर्मांकडून याचिकेत करण्यात आला आहे.
माध्यमांना विनंती
ऍड.सायली सावंत यांनी याबाबत माध्यमांना सुध्दा विनंती केली असून, सर्व माध्यमांनी जबाबदार व अचूक वार्तांकन करावे तसेच न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर आधारित कोणतीही दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या वार्तांकन पासून दूर रहावे, कुणाचीही नाहक बदनामी होईल, असे चुकीचे वार्तांकन करू नये. कुठल्याही माध्यम कर्मिना याबाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास ते वकिलांना मागावे, असे आवाहन ऍड.सायली सावंत यांनी केले आहे.
हेही वाचा
धनंजय मुंडेंचं 1998 मध्येच शुभ मंगल सावधान; करुणा शर्माच पहिल्या पत्नी, कोर्ट ऑर्डरमध्ये नेमकं काय?