Dhananjay Munde Emotional: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला .9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करत त्यानंतर निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून बीडसह संपूर्ण राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे . मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सातत्याने केली जात असून वाल्मीक कराडशी असणारे वैयक्तिक संबंध, बीड मधील वाल्मीक कराडची दहशत आणि धनंजय मुंडे यांचे त्याच्याशी असणारे आर्थिक संबंधांवर बोट ठेवत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर सततच्या आरोपामुळे आज (28 जानेवारी) धनंजय मुंडे भावनिक झाले होते . आज दुपारी कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांची प्रतिक्रिया देताना राजीनामेच्या मागणीवर उत्तर देणार नसल्याचे सांगत धनंजय मुंडे यांनी सतत होणाऱ्या आरोपांवर भावनिक होत प्रतिक्रिया दिली . (Santosh Deshmukh Case)


धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले तुमचं मुल तिसरीला शाळेत जात असेल..


 ज्यावेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात, त्याचा थेट तुमच्यावरती आणि तुम्हाला जर लहान मूल असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा . मी राजीनामा द्यावा की देऊ नये मी दोषी आहे की नाही याबाबत जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं असं धनंजय मुंडे म्हणाले .


 



अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेऊन राजीनामा मागितला, त्यासंदर्भातील प्रश्नावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया अजित पवार यांना भेटल्या, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्री अजित पवार यावर उत्तर देतील आणि त्यांनीच द्यावं अशी माझी अपेक्षा आहे, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच,  अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपावर बोलताना, राखेसंदर्भात थर्मस पावर स्टेशननं केलेला तो कचरा आहे, तो कचरा साफ करायचं काम संबंधित स्टेशनचं आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने 2006 च्या निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळे, प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा निर्णय येतच नाही, असेही मुंडे म्हणाले.  जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं असं धनंजय मुंडे म्हणाले .


हेही वाचा:


अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल