बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठणारे फोटो काल आरोपपत्रातून समोर आले होते. या आरोपपत्रातील फोटो व्हायरल झाल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री धनंजय मंडे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे  उपस्थित होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर येताच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी मला काही बोलायचं नाही, असं ते म्हणाले. 

Continues below advertisement

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची अपडेट, धनंजय देशमुख म्हणाले...

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख  यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारलं असता त्यांनी पहिली प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली. ते म्हणाले.. याच्यावर मला काहीच बोलायचं नाही, आतापर्यंत दोन महिन्यात जी तकलीफ झाली. याच राजकीय पाठबळानं आम्हाला धमकावण्यात आलं. आरोपी इथं आल्यावर त्याचं समर्थन करण्यात आलं, मोर्चे काढण्यात आले. ही नैतिकता होती त्यांची खरं तरं, आरोपींना समर्थन करु नका, आरोपींचं मनोबल वाढवू नका, का नाही केलं असं. म्हणून मला त्या गोष्टीवर काहीच बोलायचं नाहीये, असं धनंजय देशमुख म्हणाले. 

सगळं राजकीय पाठबळानं आतापर्यंत सगळं केलं आहे. राजकीय पाठबळ देणाऱ्याला ही गोष्ट माहिती आहे. हे बीडला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं याच्यावर बोलणं हे पालथ्या घड्यावर पाणी घालण्यासारखं आहे, असं धनंजय देशमुख म्हणाले. 

Continues below advertisement

अंजली दमानिया काय म्हणाल्या? 

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी असंख्य लोकांचे मेसेज आले की झोप लागत नाही. धनंजय देशमुखचा रात्री अडीचला मेसेज आला आहे की मला हे बघवत नाही. मी सकाळी त्याच्याशी बोलले की असं काही करु नको, तू शांततेनं लढला. आता तुझ्यावर घराची जबाबदारी आहे, असं त्याला सांगितल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या. सगळे रडतायत आणि शासनाला अजूनही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वाट पाहायची आहे, काय बोलायचं हे कळत नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या. 

प्रेम भावना, संवेदना राजकारण्यांच्या संपल्या आहेत. व्हिडिओ काय आहेत, ऑडिओ काय आहेत माहिती होतं, फोटो पाहिले होते, तरी वाल्मिक कराडला स्पेशल चहा, जेवण दिलं जातं, हातकड्या का नाहीत, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. या माणसाला बडतर्फ करा, असं दमानिया म्हणाल्या. 

इतर बातम्या : 

Dhananjay Munde Resignation: देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; राजकीय घडामोडींना वेग