Madha Loksabha : "राज्यात महाविकास आघाडीच्या 30 ते 35 जागा येतील, असा प्राथमिक अंदाज आहे. मला खात्री आहे की, त्या पद्धतीचे वातावरण महाराष्ट्रामध्ये झालं होतं. सोलापूर, माढा आणि बारामती लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे. शिवाय साताऱ्याची जागाही निवडून येईल. माढा लोकसभेत आम्ही 80 हजार ते 1 लाख मतांनी विजयी होऊ", असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.


कार्यकर्त्यांमुळे माझा विजय नक्कीच होणार 


धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, सर्व एक्झिट पोलमध्ये माढ्यातून मला आघाडी दाखवण्यात आली. मला खात्री आहे की, माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मनापासून मला मतदान केलं आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांमुळे माझा विजय नक्कीच होणार आहे.  


माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील वि. रणजितसिंह नाईक निंबाळकर 


माढा लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासूनच चर्चेत राहिलेला मतदारसंघ असून येथे भाजपचे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. माढ्यामध्ये मनोज जरांगे यांचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. आता निकाल कुणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही बाजूने आपल्या विजयाचे दावे केले जात आहेत.  






इतर महत्वाच्या बातम्या 


Kalyan Loksabha 2024 : श्रीकांत शिंदे विजयाची हॅटट्रीक मारणार की वैशाली दरेकर विजयी होणार? शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या लढाईत कोण मारणार बाजी?