मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक अत्यंत दुर्मिळ आणि लक्षवेधी घडामोड पाहायला मिळाली आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या मराठी व्यंगचित्रकलेचा 100 वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले. ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित हा प्रकाशन सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात पार पडला. मात्र, या कार्यक्रमापेक्षाही कार्यक्रमाआधी झालेल्या एका विशेष प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

Continues below advertisement

Closed Door Meeting Politics : कार्यक्रमाआधी बंद दाराआड गुप्त चर्चा

या सार्वजनिक कार्यक्रमाच्या औपचारिक सुरुवातीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा पार पडली. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Political Background : चर्चेला उधाण येण्यामागची राजकीय पार्श्वभूमी

या तिन्ही नेत्यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील टोरेंट पॉवर प्रकल्पाच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याचसोबत ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणात उद्धव ठाकरे यांची शिवसेना अत्यंत आक्रमक झाली आहे. आदित्य ठाकरेंनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

Continues below advertisement

नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने तीन जागांवर तर महायुतीने दोन विजय मिळवला. यामध्ये पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधरची जागा भाजपला गमवावी लागली. मात्र, त्यानंतर महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. 

या सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी ताज्या असतानाच तिन्ही दिग्गज नेते एकत्र आल्याने आणि त्यांच्यात गुप्त चर्चा झाल्याने विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Pravin Darekar Clarification : भाजपची प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. 'हा एक पूर्णपणे सांस्कृतिक आणि वेगळा कार्यक्रम आहे. मराठी व्यंगचित्रकलेच्या प्रवासावरील पुस्तकासाठी हे नेते एकत्र आले आहेत. तीन मोठे नेते एका मंचावर किंवा एकत्र आले म्हणजे त्यामागे काहीतरी राजकारण आहेच असा अर्थ काढणे योग्य नाही,' असे स्पष्टीकरण प्रवीण दरेकर यांनी दिले आहे.

ही बातमी वाचा: