Devendra Fadnavis on Missing Link Potholes:मुंबई-पुणे मार्गावरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पा उद्घाटन होऊन अवघे दोन महिने उलटलेअसतानाचयामार्गावरील कामाच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाचा दावा करतमहायुतीसरकारने 1 मे रोजी मोठ्याथाटातउदघाटनकरतयामहत्वाकांक्षीप्रकल्पजनतेसाठीखुलाकेला. मात्रपहिल्याचपावसानंयारस्तावर खड्ड्यांचे (Missing Link Potholes) साम्राज्य निर्माण झाल्यानेअनेकप्रश्ननिर्माणकेलेजातआहे. तरविरोधकांकडूनहीटीकेचीझोडवली जातआहे. अशातचराज्याचेमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) यांनीयाबाबतस्पष्टीकरणदेतप्रतिक्रियादिलीआहे. (Devendra Fadnavis on Missing Link Potholes)

Continues below advertisement

मिसिंग लिंकवर खड्डे पडलेत, कनेक्टरजवळ दोन खड्डे पडलेत, बाकी कुठेही खड्डे नाहीत. मात्र काही लोकांना आनंद आहे की, कुठल्याही गोष्टीला खूप मोठं करायचं. कुठलंही काम झाल्यावर आणि पहिला पाऊस झाल्यावर दुसरी लेयर येते. त्या पावसामध्ये रस्त्याची टिकण्याची क्षमता टेस्ट करण्यातयेतआणि काय अडचणी येतील, ते टेस्ट करत असतो. परिणामी, 'निंदकाचे घर असावे शेजारी' त्यामुळे हरकत नाही, एमएसआरडीसी योग्य काळजी घेईल. अशी प्रतिक्रीयामुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांनीदिली.

Devendra Fadnavis on Missing Link Potholes: आपण पहिल्यांदा हे करुन दाखवलंय, त्यामुळे निव्वळ टीका करणं योग्य नाही

Continues below advertisement

नवीन उड्डाणपुल केल्यावर त्याठिकाणी मास्टिक एस्फाल्ट सुरुवातीला जमा होते. त्यानंतर योग्य पद्दतीने चालते. केलेलं काम सेटल करावे लागते, या इंजिनिअरिंगच्या गोष्टी आहेत. कुठे काही कमतरता असतील तर दूर करता येतील. पण देशातील सर्वात उंच पूल, देशातील सर्वात रुंद बोगदे, डॅमच्या खाली बोगदा हे पहिल्यांदा आपण करुन दाखवलंय. त्यामुळे निव्वळ टीका करणं योग्य नाही असेहीमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसम्हणाले.

Devendra Fadnavis on Mumbai Rain: पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईकरांची चिंता वाढण्याची शक्यता

मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पहाटेपासून ठराविक अंतराने पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबई आणि पालघर जिल्ह्याला पुढील काही तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट असून या भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर वसई आणि विरार परिसरातही सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. नालासोपारा परिसरातही कंबरेइतके पाणी साचले आहे. समुद्राला दुपारी दोनच्या सुमारास भरती आली आहे. त्यामुळे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईकरांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या