Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढणार आहेत. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू 26 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. आज मुंबईत (23 जुलै) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha)

Continues below advertisement

मुलांना मारल्यानंतर हा मुद्दा आता प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत राहिला नाही, तर पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत गेला आहे, असं राज ठाकरे म्हणाले. रविवारी 26 जुलैला छत्रपती शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील सहभागी व्हावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. तसेच कोणत्याही पक्षाचा झेंडा या मोर्चात नसेल, फक्त तिरंगा असेल, असं ठाकरे बंधूंनी सांगितलं. प्रश्न सोडवायचा की चिघळवायचा हे आता तुम्ही बघा.., असंही राज ठाकरे म्हणाले. 26 जुलैच्या आंदोलनात शरद पवारही येऊ शकतात. भाजपचे देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण हे आता कळेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray)

मी आठवण करुन देतो, राज्यातला सर्वात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मु्ख्यमंत्री असताना झाला. यामध्ये आयएएस अधिकाऱ्यांपासून सगळे सामील होते. इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही. तसेच केवळ टीईटी घोटाळाच झाला नाही, तर जे नापास होते, त्यांना पास करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात झालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही टीईटी परिक्षेत घोटाळा होत असल्याचं लक्षात येताच, परिक्षेआधी घोटाळेबाजांना पकडलं. स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून हे बंद करा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

Continues below advertisement

दिल्लीसारखं कोणाला घुसवण्याचे प्रयत्न केल्यास त्यांना फटकावून काढू- राज ठाकरे (Raj Thackeray CJP Protest)

26 जुलैच्या मोर्चात दिल्लीसारखं कोणाला घुसवण्याचे प्रयत्न केल्यास त्यांना फटकावून काढू...शांततेने हा मोर्चा असेल, शांतपणे या सगळ्या गोष्टी होतील. या मोर्चात कोणतीही हुल्लडबाजी नसेल. पण जर तुम्ही दिल्लीसारखं इकडे काही करण्याचा प्रयत्न केला, तर आमची लोक सोडणार नाही, असा गर्भित इशारा ठाकरे बंधूंनी दिला. 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे- (Raj Thackeray Uddhav Thackeray PC On CJP Protest)

  1. विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पदावर असताना जबाबदारी घ्यायलाच हवी...मुद्दा समजून घेतला असता, तर आज ही वेळ आली नसती- राज ठाकरे
  2. नरेंद्र मोदींनी आज ट्विट केलं आहे, त्याला काहीच अर्थ नाही. ही कुठली सत्ता, कुठला सत्तेचा माज?- राज ठाकरे
  3. आम्ही 26 जुलै रोजी राग व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढत आहोत. सकाळी छत्रपती शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील सहभागी व्हावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. तसेच कोणत्याही पक्षाचा झेंडा या मोर्चात नसेल, फक्त तिरंगा असेल.- राज ठाकरे
  4. शरद पवार काल नरेंद्र मोदींना भेटले, त्यालाच जंतर मंतर म्हणतात.- राज ठाकरे
  5. विद्यार्थ्यांचं आंदोलन आता घरोघरी पोहोचल्यामुळे सरकार आता बॅकफूटवर गेलं आहे. - राज ठाकरे
  6. मुंबईतल्या आमच्या आंदोलनात दिल्लीसारखे कोणी घुसलेले मिळाले तर त्यांना सोडणार नाही, फटकवून काढू- राज ठाकरे
  7. हा विषय आता NEET पुरता राहिला नाही. गेल्या काही वर्षांचा राग आता उफाळून आला आहे. न्यायमूर्ती यांना या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे बोलत आहे. मुलींना मारले गेले आहे. लाठ्याकाठ्यांनी मारले गेले. खिळे लावून मारले कपडे फाडले. न्यायलयाला कुत्रे कबूतराणाकडे लक्ष द्यायला वेळ आहे, मात्र झुरळांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. -उद्धव ठाकरे
  8. 26 जुलैच्या आंदोलनात शरद पवारही येऊ शकतात. भाजपचे देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण हे आता कळेल.- उद्धव ठाकरे
  9. पंतप्रधानांनी आज एक  एक ट्विट केलंय. खरं म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती. म्हणजे, यामध्ये कमीपणा बाळगण्याचं कारण नाही. आपली मुलं आहेत, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटायची गरज नाही. -उद्धव ठाकरे
  10. न्यायालयाची परिस्थितीसुद्धा धृतराष्ट्रासारखी झालीये का? म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे आता.मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती,  ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधलीये का? आणि कशासाठी बांधलीये?- उद्धव ठाकरे
  11. विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालं आहे. हीच मुलं होती. त्यांनी 'अच्छे दिन'ची अपेक्षा व्यक्त करत या सरकारला निवडून आणलं होतं. पण, हे सरकार निर्दयीपणे वागत आहे. - उद्धव ठाकरे
  12. काही सिव्हिल ड्रेसमधील लोकांकडे पोलिसांच्या लाठ्या कशा आल्या? हे आंदोलन मोडायला भाजपने पाकिस्तानमधून गुंड आणले आहेत का?- उद्धव ठाकरे

संबंधित बातमी:

Raj Thackeray Uddhav Thackeray PC On CJP Protest: आता तुम्ही बघा, तिरंगा घेऊन सहभागी व्हा...; ठाकरे बंधूंच्या मुंबईत मोर्चा, पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे!