Devendra Fadnavis on Eknath Shinde, Mumbai : "मी काल स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. तुम्ही स्वत: या सरकारमध्ये आमच्यासोबत राहायला हवं, असं निवदेन मी एकनाथरावांना केलं होतं. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सरकारमध्ये राहावं, अशी शिवसेनेच्या आमदारांची (Shivsena MLA) देखील इच्छा आहे. महायुतीच्या आमदारांची देखील हीच इच्छा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ते आमच्या सरकारमध्ये असतील", असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 


लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार काम करेलं


देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील अडिच वर्षात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी असं तिघांनी एकत्रितपणे निर्णय घेतले आहेत. आज देखील आम्हाला हे पद तांत्रिक बाब आहे. इतर आमच्या मित्र पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने हे सरकार काम करेलं. 
मी एकनाथ शिंदे यांचं आभार मानतो. त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, असं पत्र दिलेलं आहे.  अजित पवार आणि इतर पक्षांनीही पत्र दिलेलं आहे. मी सर्वांचं आभार मानतो. रामदास आठवले यांचेही मी आभार मानतो.


आम्ही एकत्रीतपणे निर्णय घेणार आहोत


पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ⁠पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणार आहे.  किती मंत्री शपथ घेणार या संदर्भात संध्याकाळी माहिती देऊ. आम्ही एकत्रीतपणे निर्णय घेणार आहोत. ⁠काल एकनाथ शिंदे यांची मी भेट घेतली आणि त्यांनी या मंत्रीमंडळात राहावं अशी विनंती केली.  ⁠तेही  सकारात्मकता दाखवतील याची मला खात्री आहे.  ⁠जी आश्वासन दिली आहे ती पुर्ण करु, असा निर्धारही देवेंद्र फडणवीस यांनी केला. 


मी दिल्लीला कोणाला भेटायला गेलो नव्हतो - अजित पवार 


अजित पवार म्हणाले, मी दिल्लीला कोणाला भेटायला गेलो नव्हतो, तर माझ्या कामासाठी गेलो होतो. ⁠बंगल्याच्या संदर्भात अर्किटेकला भेटायचं होतं. सोबत आमच्या केसेस सुरु आहे, त्या संदर्भात वकिलांना भेटायचं होतं. इथल्यापेक्षा तिथे आराम मिळतो.  ⁠म्हणून डोक्यातून काढून टाका मी कोणाला भेटायला गेलो होतो. 





इतर महत्त्वाच्या बातम्या 


एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे सर्व नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावा केला, उद्या शपथविधी सोहळा