CM Devendra Fadnavis On Dhananjay Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सध्या वाल्मिक कराड यांना चौकशीसाठी सीआयडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी देखील सुरु आहे. पण हे वाल्मिक कराड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी केली जात आहे.  


धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis On Dhananjay Munde) यांनी देखील भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर आरोपी कुठेही गेले असतील, कोणीही मदत केली असली तरी त्यांच्यावर कारवाई सुरु आहे हे दिसतंय. मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाहीय. या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करु नये,  सरपंचाची हत्या झाली आहे. त्या हत्येचं राजकारण होऊ नये, तर समाजात काहीतरी सुधार व्हावा...असा आमचा प्रयत्न आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 


हप्ते वसुली करणाऱ्यांवर जरब बसवणार- देवेंद्र फडणवीस


मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करतंय. काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाला. तरी आम्ही तसं होऊ देणार नाही. जे कोणी दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुशंगाने दादागिरी हप्ते वसुली करणाऱ्यांवर जरब बसवयचं आम्ही ठरवलं आहे. त्याबाबत योग्य कारवाई सुरु आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.


जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप- 


संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटीमध्ये एक प्रमुख आयपीएस बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पाहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पाहा..हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने यांनी निवडणूक काळात धंनंजय मुंडेचा कार्यकर्ता आसल्याप्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा आत्यंत खास माणुस आसून गेले 10 वर्षे तो बीड एलसीबीमध्येच आहे आणि वाल्मिक कराडसाठी काम करतोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 




देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?, VIDEO:



संबंधित बातमी:


वाल्मिक कराड सरेंडर, पण सुदर्शन घुले त्यापेक्षा डेंजर; सरपंच हत्येतील मुख्य आरोपी घुले कोण?