Devendra Fadnavis, Bhiwandi Meeting : भिवंडी लोकसभा (Bhiwandi Loksabha) निवडणुकीत नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून व फतवे काढून वोट जिहाद घडविले जात आहे, त्याला वोट यज्ञने उत्तर दिले जाईल. एक-एक देशभक्त वोट एकत्र करून समर्पणाच्या रुपाने यज्ञामध्ये समिधा म्हणून टाकेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भिवंडीतील जाहीर सभेत केले. महायुतीचे उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या प्रचारासाठी फडणवीस शनिवारी शहरातील अंजुरफाटा येथे जाहीर सभेत बोलत होते. यावेळी देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये भिवंडीतील अग्रगण्य श्यामा-श्याम सत्संग समितीने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.


यावेळी अनुसुचित श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार महेश चौघुले, निरंजन डावखरे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष माने, मनोज काटेकर, भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, मनसेचे मनोज गुळवी आदींसह महायुतीचे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


मोदींच्या नेतृत्वाखालील पांडवांकडून शस्त्राने नव्हे तर वोटने उत्तर दिले जाईल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी मतदान करा,असे कोणी सांगत असेल,त्यांना जो मोदी का नही, वो हमारे काम का नही',असे उत्तर द्यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. तसेच महाभारतातील लढाईचा संदर्भ देत इंडी आघाडीत राहुल गांधी, उद्धव ठाकरे असे कौरव जमा झाले असून, या लढाईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील पांडवांकडून शस्त्राने नव्हे तर वोटने उत्तर दिले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Suhas Palshikar : महाराष्ट्राची हवा कुणाच्या बाजूने? देशात कुणाची सत्ता? राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांचे 'माझा कट्टा'वर बेधडक विश्लेषण