सिंधुदुर्ग : मिठबाव शाखेत शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेषात सहभागी झाले. त्यांनी संचलनातही सक्रिय सहभाग नोंदवला. राणे म्हणाले, "हा शताब्दी उत्सव भारताचा अढळ निर्धार आहे," आणि "संघाचे विचार हीच भारताची खरी ताकद आहे.
✕
- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: यंदा राज्यात पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष
Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: यंदा राज्यात पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष
Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री पंकजा मुंडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे आज दसरा मेळावा घेणार आहे.
Advertisement
मुकेश चव्हाण Last Updated: 02 Oct 2025 05:26 PM
पार्श्वभूमी
Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आज...More
Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आज दसरा मेळावा घेणार आहे. तर यंदा बंजारा समाजाकडूनही दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात. त्याप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. य़ावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे.. दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का? यासंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे होणार आहे. या मेळाव्याची वेळ सायंकाळी 6 वाजता असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही…अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे. या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी मेळाव्याचं ठिकाणी आझाद मैदान ठरलेलं मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने ठिकाण बदलण्यात आलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनोज जरांगे यांनी आंदोलनाची दिशा बदलली ? आता शेतकऱ्यांसाठी लढणार
Choupal - मनोज जरांगे यांनी आंदोलनाची दिशा बदलली ? आता शेतकऱ्यांसाठी लढणार
Ac - नारायणगड येथील मेळाव्यात आज मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाची दिशा बदलल्याचे दिसून आले.भाषणाच्या सुरुवातीला आधी मनोज जरांगे यांनी आरक्षणाबाबत भाष्य केले.त्यानंतर सध्या बीडसह मराठवाड्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी आणि पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगत त्यांच्या नवीन आंदोलनाची घोषणा केली.दरम्यान मनोज जरांगे यांच्या मेळाव्यानंतर त्यांच्या भाषणाबद्दल आणि नवीन भूमिकेबद्दल समाज बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी....
= liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कांग्रेसवाले घाणेरडं बोलतात आणि युबीटीवाले त्यांच्या मांडीवर जाऊन बसतात : उदय सामंत
उदय सामंत
एकनाथ शिंदे साहेबांनी सामाजिक भान ठेवत आझाद मैदानातील मेळावा रद्द केला आणि नेस्को मध्ये केला
विदर्भ, मराठवाडा आणि पूरग्रस्त भागातील लोकांची मदत शिवसैनिकांनी करावी असे निर्देश शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत
शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पालिकेत अनेक प्रकल्प दिले आहेत
अशात महापालिकेत नागरिक आमच्याच पारड्यात मतं टाकतील
आॅन संजय राऊत
गेले साडे तीन वर्ष घाणेरडी चिखलफेक त्यांनी केली
नापास विद्यार्थी आम्हाला शिकवू शकत नाही
शिवसेनेने कांग्रेसच्या मांडीवर जात बाण नेऊन ठेवला होता
आम्ही तो ओढून आणला आहे
नवीन ते काही बोलत आहेत असं वाटत नाही
शिंदे साहेब काय कोणाची बदनामी बिलो द बेल्ट बोलणार नाही
केलेली सामाजिक कामं आणि विकास कामं समोर ठेवत शिंदे साहेब बोलतील
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कांग्रेसवाले घाणेरडं बोलतात आणि युबीटीवाले त्यांच्या मांडीवर जाऊन बसतात
राज साहेब ठाकरे कधी तरी उद्धव ठाकरेंना याबद्दल विचारतील तेव्हा काय उत्तर देणार
लोकशाही कोणी एकत्र यायचं आणि नाही यायचं हे नेते ठरवत असतात मात्र काही लोकं उतावळे झाले आहेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भिवंडीतून दसरा मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्त्यांचा उत्साह, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणांची अपेक्षा
Anc :- शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा आज होत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा रंगणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यासह भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण परिसरातून हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या उत्साहात स्वतःच्या गाड्यांनी रवाना झाले आहेत.
मेळाव्यात शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मराठवाड्यातील ओला दुष्काळ, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठ्या प्रमाणातील नुकसान आणि पूरग्रस्तांच्या मदतीसंबंधी महत्त्वाच्या घोषणा करतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या मेळाव्यात राज्यातील इतर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले असून, पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी ठोस उपाययोजना जाहीर केल्या जातील, अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील व भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिली.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने हा दसरा मेळावा शेतकऱ्यांसाठी विशेष ठरणार आहे. राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक प्रशासक बनावे लागेल: मनोज जरांगे
मनोज जरांगे भाषण पॉइंटर्स
- मी थोड्या दिवसाचा पाहुणा हे मी सहा महिन्यापूर्वी सांगितले होते
- मला गरिबाच्या मुलाचे कल्याण करायचे हे मी सांगितले होते
- कुणीही मागे हटयचे नाही
- मुंबईची लढाई जिंकून जीआर आनला
- जरंगे पाटील यांच्या डोळ्यात पाणी
- 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी रहावेत ही माझी ईछा होती
- हैदराबाद,सातारा गॅझेट नंतर राज्याला वेढा टाकण्याची ताकद भेटणार होती ,म्हणून काहींनी यात अरफाटे आणले
- मी कुणाशी गद्दरी केली नाही
- पांढरे कपडे घालून 45 वर्ष यांना काहीच करता आले नाही,यांनी समाजाला काही दिले नाही
- 58 लक्ष मराठ्यांना मी आरक्षण दिले
- मी दोन वर्षात सगळा मराठा आरक्षणात घेतला
- जे मिळाले ते खूप मिळाले आहे
- मी आणि माझ्या समाजाने सगळ्याच्या मुंडक्याव र पाय दिले
- मराठ्यांनी टगळ मंगळ बंद कार्याची
- मराठ्यांनी शासक प्रशासक दोन्ही बनायचे
- जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक प्रशासक बनावे लागेल
- हे तुम्हाला दसऱ्याच्या निमित्ताने सांगतोय
- प्रत्येक क्षेत्रात आपलं लेकरू गेल तर आपल्या लेकराला आधार होईल
- सगळे बोगस आरक्षण घेऊन बसले आहेत
- सत्ता असो किंवा नसो प्रशासनात आपला माणूस असला की तो काहीही करू शकतो
- सगळे त्याचे बसले आहेत
- तुमच्या डोक्यातली दया माया आणखी जात नाही
- कुणी आपल्या जातीचा अपमान केला की त्यानं मरेपर्यंत झटका दाखवा
- आधी डिवचले जाते पुन्हा मी बोललो की चार महिने गप्प बसतात
- गुलामीचे गॅझेट म्हणणारे
- आमचे गुलामीचे गॅजेट्स मग इंग्रज तुमच्या घरात राहत होता का
- त्या नाकतोडीला मी बोललो का
- नाव न घेता टीका
- आमच्या लेकराला गुलाम समझता का तुम्ही
- त्याचसोबत राहणाऱ्या त्यांच्या प्रचार करणाऱ्याला जरांगे यांनी सुनावले
- तुमच्या मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हणणाऱ्या सोबत कशाला काम करता
- किती चातुगिरी करणार
- इंग्रज तुमच्या परिवारातला 1931 इंग्रजाच्या जनगणना तून आरक्षण घेतले मग आम्ही इंग्रज म्हणायचे का
- अकबर बादशाह कडून पळून आलात का?
- आम्ही भीत नाही
- बादशाह राजस्थानला होता त्याने तुम्हाला हाकलून दिले अस म्हणावे का,सगळ्याला बोलत येते
- 30 वर्ष तुम्हाला निवडून दिल ते याकरिता का
- हे बदलणारच नाहीत त्याच्यामुळे दया माया कमी करा
- आपण पडायला सुरुवात केले की गप्प बसतात
- इथून पुढ जो बोलेन त्याला सोडायचे नाही
- ओबीसी ला बोलू नका
- एक छग्या बावाचला आहे त्या मी पाण्यात बांधतो

छत्रपती घराण्याचा शाही दसरा उत्सव साध्या पद्धतीने पार पडणार.
सातारा:छत्रपती घराण्याचा शाही दसरा उत्सव साध्या पद्धतीने पार पडणार.
सीमोलंघन सोहळा साध्या पद्धतीने साजरा करून यावर्षीचा मिळणारा शासकीय खर्च पूरग्रस्तांसाठी वर्ग करण्याचा निर्णय..
खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती
अँकर- साताऱ्यातील छत्रपती राजघराण्याचा दसरा सीमोलंघन सोहळा यावर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी या दिवशी मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न होतो. घोडे,उंट, आणि ढोल ताशांच्या गजरात सीमोल्लंघन सोहळा पार पडत असतो मात्र यावर्षी राज्यातील पूर परिस्थितीचा विचार करून या वर्षी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दसरा उत्सव आणि सीमा उल्लंघन सोहळा साध्या पद्धतीने पार पडणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत
बाईट -खासदार उदयनराजे भोसले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर
राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला येत आहे
आपला घरचा डब्बा आपली चटणी भाकर घेऊन हे शिवसैनिक शिवाजी पार्कवर जेवायला बसलेले पाहायला मिळताय
उत्तर महाराष्ट्रातील हे सगळे शिवसैनिक दरवर्षी अगदी बाळासाहेब ठाकरे पासून आणि आता उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहतात
या परंपरेत कुठेही खंड हे शिवसैनिक पडू देत नाहीत... स्वखर्चाने आपल्या घरून जेवणाचा डब्बा घेऊन हे शिवसैनिक दसरा मेळाव्याला उपस्थित राहतात आणि उद्धव ठाकरे हे नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे या सगळ्यांचे लक्ष आहे
शिंदे यांचा शिवसेना मेळावा, राज ठाकरे उद्धव ठाकरे युती, पक्ष सोडून गेलेले शिवसैनिक या सगळ्यांवर या उत्तर महाराष्ट्रातील ठाकरे यांच्या शिवसैनिकांना काय वाटतं त्यांच्याशी बातचीत केली आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मराठवाडा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनसेचा मदतीचा हात
मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण रविवारपासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार असून, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा पुरवठा केला जाणार आहे. लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर भागांमध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली बी-बियाणे आणि खते मनसेकडून दिली जाणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कर्जत तालुक्यात जमिनीच्या वादातून गोळीबार; चार आरोपी ताब्यात, पिस्तूल जप्त
कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायतीअंतर्गत वाडी वसाहतीत जमिनीच्या वादातून बुधवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी एकाला घटनास्थळी पकडले, तर तिघांना तातडीने अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मंत्री पंकजा मुंडे सावरगाव घाट येथे हेलिकॉप्टरने दाखल
मंत्री पंकजा मुंडे सावरगाव घाट गावात दाखल झाल्यात. मुंबईहून हेलिकॉप्टरने पंकजा मुंडे सावरगाव घाट इथल्या भगवान भक्ती गडावर दाखल होतायत. काही मिनिटांचे अंतर पार करून भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे पोहोचतील. त्यानंतर भगवान बाबांची मूर्ती असलेल्या गाभाऱ्यात पूजा आरती करून पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समवेत त्यांच्या बहीण माजी खासदार प्रीतम मुंडे, मुलगा आर्यमन आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जामनेरमध्ये विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग
जळगाव : विजयादशमीच्या मुहूर्तावर जामनेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. पथसंचलनाच्या मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण करत संघाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. गिरीश महाजन गेल्या ३५ वर्षांपासून या पथसंचालनात नियमित सहभाग घेत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मालेगावात विजया दशमीनिमित्त संघाचे पथसंचलन; नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत
मालेगाव : विजया दशमीच्या निमित्ताने मालेगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शस्त्रपूजनानंतर पारंपरिक पथसंचलन आयोजित करण्यात आले. भुईकोट किल्ल्यातून सुरू झालेल्या संचलनाची सांगता देखील भुईकोट किल्ल्यातच झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून गेलेल्या या संचलनात नागरिकांनी फुलांची उधळण करत स्वयंसेवकांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
संघ पथसंचलनावर अशोक चव्हाणांनी उधळली फुले
नांदेड : विजयादशमीनिमित्त आज नांदेड शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पथसंचलन केले. हे पथसंचलन शिवाजीनगर परिसरात येताच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या पथसंचलनातील संघ स्वयंसेवकांवर फुलांची उधळण केली. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार माजी महापौर आदी मंडळी देखील उपस्थित होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सोलापूरमध्ये कांदा नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक दाखल होणार
सोलापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि सीना नदीच्या महापुरामुळे हजारो शेतकऱ्यांचे कांदा पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सुमारे 90% कांदा पीक खराब झाल्याची माहिती आहे. एकूण ४०,००० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कांदा पीक नुकसानीला सामोरे गेलं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक उद्या सकाळी सोलापुरात दाखल होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिकमध्ये दुर्गा दौडपूर्वी पाकिस्तानच्या झेंड्याची रांगोळी; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हटवली
नाशिक : विजया दशमी निमित्त नाशिकच्या पंचवटी परिसरात दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडीपूर्वी मालवीय चौकात पाकिस्तानच्या झेंड्याची रांगोळी काढण्यात आली होती. पाकिस्तानचा निषेध व्यक्त करण्यासाठी ही रांगोळी काढण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, दुर्गा दौड रांगोळीवरूनच जाणार होती, यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ती रांगोळी हटवली. ही दुर्गा दौड संभाजी गुरुजींच्या स्वयंसेवकांकडून आयोजित करण्यात आली होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भगवानगडाला केंद्र सरकारकडून 10 एकर जमीन; महंत नामदेव शास्त्रींच्या पाठपुराव्याला यश
केंद्र सरकारने भगवानगडाला वनविभागाची 10 एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे महंत नामदेव शास्त्री यांच्या पाठपुराव्याचे मोठे योगदान असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः भूमी हस्तांतरणासाठी गडावर येणार असल्याची माहिती देत, या उपक्रमाचे नेतृत्व धनंजय मुंडे करतील, असे महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितले. या जमिनीवर रुग्णालय, भोजन व्यवस्था आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे नियोजन आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती
नागपूर : 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुरात भीम बांधवांचा जनसागर उसळला आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात दिक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस विजयादशमीचा होता. तेव्हापासून विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याला नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर महाराष्ट्रसह देशातील कानाकोपऱ्यातून लाखो लोकं येतात. आजही सकाळपासून दीक्षाभूमीवर मोठी गर्दी बघायला मिळत आहे. जय भीमच्या घोषणा दिल्या जात आहेत. दीक्षाभूमिवरच्या भव्य बौद्ध स्तूपात बाबासाहेबांच्या अस्थी कलशाचं दर्शन घेवून त्यापुढं नतमस्तक होत आहेत. संध्याकाळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यात राजकीय व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आलेलं नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दसऱ्यानिमित्त भगवानगडावर भाविकांची मांदियाळी; धनंजय मुंडेही घेणार दर्शन
पाथर्डी येथील भगवानगडावर दसऱ्यानिमित्त राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या या भाविकांमध्ये श्रद्धेचा माहोल पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात मंत्री धनंजय मुंडे देखील समाधीचे दर्शन घेणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिंदे गटाकडून भव्य तयारी, दसरा मेळाव्यासाठी गोरेगावचे नेस्को संकुल सज्ज
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी गोरेगावच नेस्को संकुल सज्ज झालं आहे. संकुलात भव्य मंच उभारण्यात आलं असून मंचावरून एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. संकुलात बाळासाहेब ठाकरेंसह आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे कटआउट देखील लावण्यात आले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मंत्री नितेश राणे प्रथमच संघाच्या गणवेषात; मिठबाव शाखेत शस्त्रपूजनाला उपस्थित
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकल्याशिवाय परतणार नाही; शिवसैनिकांचा निर्धार
सकाळपासूनच शिवतीर्थावर शिवसैनिकांची मोठी लगबग पाहायला मिळतेय. वाशिम, अमरावतीसारख्या जिल्ह्यांमधूनही शिवसैनिक इथे दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहतोय. पाऊस असो वा वारा, कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मागे हटणार नाही, उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकल्याशिवाय परतणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दसर्याचा हा मेळावा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगत, मोठ्या संख्येनं हे शिवसैनिक आज उपस्थित राहणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना,बुलढाणा,परभणी,सोलापूर जिल्ह्यातून समर्थक दाखल
नारायण गड येथे आज मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. सकाळी 11 वा. या मेळाव्याला सुरुवात होईल.या मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर,जालना,बुलढाणा,परभणी, सोलापूर,जिल्ह्यातून समर्थक दाखल झाले आहेत. मागील वर्षीपासून जरांगे पाटील या मिळाल्या संबोधित करत आहेत. मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅजेटच्या अध्यादेशानंतर यंदाचा मेळावा हा विजय मेळावा असल्याच्या भावना यावेळी समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिवतीर्थावर जोरदार तयारी
उद्धव ठाकरे गटाचा आज पारंपरिक दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडणार आहे. सध्या मैदानावर मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. मंचाची सजावट अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताईंचा फोटो तर दुसऱ्या बाजूला उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. “विचार ठाकरेंचा, आवाज महाराष्ट्राचा” असा फलक मंचावर झळकत आहे. पावसामुळे संपूर्ण मैदान चिखलमय झाले असले तरी कार्यकर्त्यांसाठी भव्य आसनव्यवस्था उभी केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर खुर्च्या आणल्या असून त्या आता मैदानावर रचण्यास सुरुवात झाली आहे. अशा साऱ्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे काय बोलता मनसेच्या युती संदर्भात काही बोलतात का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याची नारायण गड येथे जय्यत तयारी
बीडच्या नारायणगड येथे आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे.या मेळाव्याची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.या ठिकाणी पाटील यांच्यासाठी उंचीवर व्यासपीठ बनवण्यात आले आहे मनोज जरांगे पाटील आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात शस्त्र पूजनाची तयारी पूर्ण
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात शस्त्र पूजनाची ही तयारी पूर्ण झाली आहे.. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे आगमन झाल्यानंतर ते शस्त्र पूजन करतील.. शस्त्रपूजनाच्या ठिकाणी भारताच्या तलवारी, भाले, ढाल या पारंपरिक शस्त्रांसह अत्याधुनिक शस्त्रे ज्यामध्ये "ड्रोन ची प्रतिकृती" सोबतच "पिनाका रॉकेट ची प्रतिकृती" ही ठेवण्यात आली आहे.. त्यामुळे शस्त्रपूजनात परंपरेसह आधुनिक काळात आत्मरक्षणासाठी आवश्यक आणि तंत्रज्ञानावर आधारित शस्त्र ही किती आवश्यक आहे हेच सांगण्याचा प्रयत्न शस्त्र पूजनाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या विविध शस्त्रांच्या प्रतिकृतीवरून लक्षात येत आहे...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात संघाच्या घोष पथकाकडूनही सादरीकरण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात संघाच्या घोष पथकाकडूनही सादरीकरण केले जाते.. यंदाच्या सादरीकरणासाठी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनीही घोष पथकाला काही रचना सुचवल्याची माहिती आहे.. पुढे आज जेव्हा घोष पथक विविध संघ गीताच्या रचनांचे सादरीकरण करेल. तेव्हा त्यामध्ये सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी सुचवलेल्या रचनांचाही समावेश असणार असल्याची माहिती आहे... विशेष म्हणजे विद्यमान सरसंघचालक डॉ मोहन भागवत स्वतः तरुण स्वयंसेवक असताना घोष पथकात होते.. त्यामुळे संघात वापरले जाणारे विविध संगीत वाद्य आणि घोषपथकाचे सादरीकरण या संदर्भात त्यांचा विशेष लक्ष असतो...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी संघाकडून शस्त्रपूजन केले जाते. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करतील, संघाच्या मागील १०० वर्षांच्या कामांचं महत्त्व सांगतील.. तसेच संघाच्या पुढील कामांची दिशाही सांगण्याची शक्यताय. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री नितिन गडकरींचीही कार्यक्रमाला उपस्थिती असेल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात. त्याप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. य़ावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे.. दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का ? यासंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय,
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
एकनाथ शिंदे मेळाव्यातून कोणावर निशाणा साधणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे होणार आहे. या मेळाव्याची वेळ सायंकाळी ६ वाजता असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही… अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे. या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी मेळाव्याचं ठिकाणी आझाद मैदान ठरलेलं मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने ठिकाण बदलण्यात आलं,
Tags: pankaja munde rss dasara melava uddhav thackeray raj thackeray shivsena manoj jarange 'Eknath Shinde #uddhav thackeray