Shinde Group MLA Fight : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Budget Session 2024) शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. विधीमंडळात शिंदे गटाच्या आमदारांमध्ये वाद (Shiv Sena Shinde Group MLA Fight) झाला. घडल्या प्रकारावर मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दादा भुसे यांनी महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यासोबत बाचाबाचीच्या घटनेचं खंडन केलं आहे. असं काहीही झालं नसल्याचं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात वाद झाला. यामुळे विधींमंडळातील वातावरण तापल्याचं चित्र होतं. दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी दादा भुसेंसोबत शाब्दिक चकमक झाल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. 


राड्यावर मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया


मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणावर विधिमंडळात म्हटलं की, ''माझ्या मित्रांनी मला फोन केले की, प्रसारमाध्यमांमध्ये काही बातम्या सुरु आहेत. माझे सहकारी, मित्र महेंद्र थोरवे यांच्यामध्ये काही वाद वगैरे झाले. थोरवे माझे मित्र, आमच्या पक्षाचे सहकारी आमदार आहेत, असा कुठलाही प्रकार येथे झालेला नाही, या प्रकाराचं मी खंडन करतो. विरोधा पक्षाला सीसीटीव्ही पाहायची असेल तर ते पाहू शकतात. माझी सभागृहाला विनंती आहे की, तुम्ही विधीमंडळातील हाणामारी, अमुक-तमुक काय आहे ते, सीसीटीव्ही फुटेज सदस्यांना दाखवा.''


महेंद्र थोरवे काय म्हणाले?


मंत्री असणारे दादा भुसे यांच्याकडे मी कामानिमित्ताने गेलो होतो. दोन महिन्यांपासून पाठपुरावा करतोय. आमदार भरत गोगावले असतील मी स्वतः असेल, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत. माझ्या मतदारसंघातील कामाबाबत  मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितले की काम करून घ्या. परंतु दादा भुसेंनी सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केले नाही. आज मी त्यांना त्याबाबत विचारलं की, दादा बाकीच्या लोकांची कामं झाली, त्यासाठी काल तुम्ही मीटिंग घेतली, पण मी सांगितलेलं कामं, मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही मीटिंगमध्ये घेतली नाही.


'ॲरोगंटपणे बोलल्याने आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही'


मी त्यांना विचारायला गेलो, तर दादा भुसे माझ्यावरती थोडीसे चिडून बोलले. मी विचार केला आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदार दिली आहे मंत्री म्हणून, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत. अशापद्धतीने ॲरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही आहोत. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी काही तुमच्या घरी खायला येत नाही.  तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचे काम आहे. मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे. माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या, असं सांगितलं. पण त्यांची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता. म्हणून आमच्यात थोडीची शाब्दिक चकमक झाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Shinde Group MLA Fight : मोठी बातमी! दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की, शंभूराज देसाईंची मध्यस्थी, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा