MLA Mohan Humbarde : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नांदेडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण आणखी एक काँग्रेसचा आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघाचे (Nanded South Constituency) काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे (MLA Mohan Humbarde) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari) यांची भेट घेतली आहे. त्यामुळं ते लवकरच भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, या भेटीनंतर स्वत: मोहन हंबर्डे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 


काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी भाजपचे काल मध्यरात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोहन हंबर्डे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यानंतर आता मोहन हंबर्डे हे देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर सुद्धा क्रॉस वोटिंगचा आरोप केला आहे. त्यामुळं हंबर्डे देखील भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा सध्या नांदेड जिल्ह्यात सुरू आहे.




आमदार मोहन हंबर्डे यांनी दिलं स्पष्टीकरण


राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्यानंतर स्वत: काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विकासकामांच्या संदर्भात नितीन गडकरी यांची आम्ही भेट घेतली होती. याबाबतचे पत्र देखील त्यांनी प्रसिद्ध केलं आहे. धनेगावमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 361 मुळे कायमस्वरुपी सोडवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर करावा यासाठी हंबर्डे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. धनेगाव लातूर फाटा ते दूध डेअरी चौरस्तापर्यंत उड्डाण पूल व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. याबाबत गडकरी यांनी ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, धनेगावची शेती ही राष्ट्रीय महामार्ग 361 च्या उत्तरेस आहे. तर संपूर्ण गाव हा महामार्गाच्या दक्षिणेस आहे. मात्र, दररोज वाहतूक करताना, शेतात ये जा करताना, गुरे ढोरे नेताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं लवकरात लवकर उड्डाण पूल व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. 




महत्वाच्या बातम्या:


अशोक चव्हाणांकडून अपेक्षाभंग म्हणून काँग्रेसमध्ये परत; मेहुणे अन् माजी खासदार खतगावकरांची घोषणा