Devendra Fadnavis बीड  : आमचा बीड जिल्हा (Beed) सातत्याने दुष्काळाचा (Drought) झळ सोसत आहे. त्याला दुष्काळातून बाहेर काढलं पाहजे. म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळात आपल्या हक्काचं कृष्णच पाणी आष्टी पर्यंत पोहोचण्याचा निर्णय केला आणि ते पाणी आज आष्टीपर्यंत पोहोचले आहे. पण हे पाणी केवळ आष्टी पर्यंतच मर्यादित न ठेवता ते पुढे देखील आणून आख्या जिल्ह्याला पाणीदार करायचा आहे आणि तोच आमचा प्रण असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी केली आहे. बीड येथील आयोजित फिरता नारळी सप्ताह सांगता समारंभात ते बोलत होते. 

.... मात्र पुढील पिढीला या भागात दुष्काळ बघायला मिळणार नाही- देवेंद्र फडणवीस

 एका होता मध्ये पाणी आहे आणि त्याला मागणारे अनेक जण आहेत. हौदातलं पाणी वाढत नाहीये, तर मागणाऱ्यांची हात वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये ही मराठवाड्यातील संतांच्या आशीर्वादाने समुद्राकडे वाहून जाणारे पाणी 53 % टीएमसी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठीच्या योजनेला आम्ही मान्यता दिली आहे. आता त्याचे आराखडे तयार व्हायला सुरुवात झाली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कृष्णा वहिनीला जो पूर येतो त्या पुराचे पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून हे पाणी या भागात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. सोबतच येत्या मे महिन्यात आम्ही त्याचे टेंडर देखील काढणार आहोत. त्यामुळे मराठावड्यातील आजच्या पिढीने दुष्काळ बघितला, मात्र पुढील पिढीला या भागात दुष्काळ बघायला मिळणार नाही. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गड ताब्यात घ्यायची माजी ऐपत नाही, औकातही नाही- देवेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यात सप्ताहाची फार मोठी परंपरा आहे. बीड जिल्ह्यात कधी काळी काही वाईट होत होतं,  तसे सातत्याने दाखवलं जात होतं. पण गेली 93 वर्ष नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यात होतोय. याचं मला मोठं समाधान आहे. अनेक अडचणींचा सामना करणारा बीड जिल्हा सातत्याने भक्तीचा रसात नाहून निघत आहे. आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मला मिळाली. या बीड जिल्ह्याचं वेगळं नातं आमचं तयार झालं आहे. गहिनीनाथ गडावर येण्याची संधी मला मिळाली. याच भागात विकासाचे कार्य पंकजा ताईंनी हातात घेतले. इथे बोलताना पांकजा ताईनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितले की, मी गड दत्तक घ्यावा. मात्र गड ताब्यात घ्यायची माजी ऐपत नाही, औकातही नाही. मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे. मात्र तुम्ही मला दत्तक घ्या. असे वक्तव्य ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलंय. 

हे ही वाचा 

Pankaja Munde : कुटुंबाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे आज बाबासाहेब आगेंच्या घरी जणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही बीड दौरा