मुंबई : राज्यातील मिनी विधानसभा म्हणून राज्याचं लक्ष लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज हाती आले असून भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. त्यामुळे, सकाळपासूनच भाजपने विजयाचा जल्लोष केल्याचं दिसून आलं. भाजपने (BJP) जवळपास 129 जागांवर विजय मिळवला असून शिंदेंच्या शिवसेनेनं 54 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही 40 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे, भाजप महायुतीने जवळपास सव्वा दोनशे जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, हा विजय टीम भाजपचा असून इतिहासातील सर्वात मोठं यश भारतीय जनता पक्षाचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

महाराष्ट्रात भाजपाचे 129 नगराध्यक्ष विजयी झाले असून 3 हजारांपेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपाला 2017 पेक्षा मोठा विजय मिळाला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे मोठं यश मिळालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. भाजपने 129 नगराध्यक्षपदावर विजय मिळवला असून महायुतीच्या तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते 75 टक्के आहेत. नगरसेवकपदावर भाजपने नवा रेकॉर्ड केलाय. यापूर्वीच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 1602 नगरसेवक होते, आता त्याच्या दुपटीचे 3302 नगरसेवक आहेत, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.  

गेल्या 20 ते 25 वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही, तो भाजप महायुतीला मिळाला. मी एकाही सभेत कुठल्याही पक्षाच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात बोललो नाही. मी केवळ विकासाच्या बाबतीत बोललो, विकासाची ब्लू प्रिंट आम्ही लोकांसमोर मांडली. ही पहिलीच निवडणूक होती, ज्या निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांने कोणावरही टीका न करता एवढं मोठं यश मिळवलं आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. टीम भाजपचा हा विजय आहे, लोकांच्या विश्वासाला आम्ही नक्कीच सार्थ ठरवू, विकासाला चालना देऊ, असेही फडणवीस यांनी म्हटले.  

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांनी रोडमॅप तयार केला - चव्हाण

3 हजारांच्या आसपास आमचे नगरसेवक निवडून आले असून सर्व मंत्र्यांनी आणि पदाधिकारी यांनी निवडणुकीत मोठी मेहनत केली. जवळपास 1 लाख 6 हजार बूथवर काम करणारे कार्यकर्त्यांनी ताकदीने परिश्रम घेतले. अमित शाह म्हणतात 51 टक्के लढाई संसद ते पंचायत कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेऊन लढली पाहिजे. त्यानुसार, कोणत्याही नरेटिव्हला बळी न पडता आम्ही या निवडणुका जिंकल्या आहेत. लोकसभेला त्यांनी खोटा नरेटिव्ह पसरवला परंतु आता ते यशस्वी झाले नाहीत. खोटा नरेटिव्ह त्यांनी या देखील निवडणुकीत पसरवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी झाले नाहीत, अशी प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी रोड मॅप तयार केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा मॅप असणार आहे. सरकार मायबाप म्हणून कसे राहिल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अचानक आलेला पाऊस, झालेल नुकसान या सर्वांबाबत नियम शिथिल करून मदत करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली, असेही चव्हाण यांनी म्हटले. 

उद्धव ठाकरेंना कौल दिला

राज्यात 288 ठिकाणी निवडणुका होत्या या निवडणुकीत विरोधक नव्हते. उद्धव ठाकरे म्हणाले होते महाराष्ट्रातील जनतेला द्यायला माझ्याकडे काहीच नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा त्याच प्रकारे कौल दिला.  2 आकडी देखील संख्या त्यांना ओलांडता आली नाही, अशी टीकाही रविंद्र चव्हाण यांनी केली. 

हेही वाचा

सोलापुरातील निकालाची वैशिष्ट्ये; भाजपला अति-आत्मविश्वास नडला; शहाजी बापूंनी दाखवली कमाल