Devendra Fadnavis, Mumbai : मुंबई, दि. 5: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) ,उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
थोड्याच वेळात सरकारची पत्रकार परिषद
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार, एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर थोड्याच वेळात नव्या सरकारची पत्रकार परिषद होणार आहे. महायुतीचे नेते पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी सरकार पुढे लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी अशा जनतेला दिलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता करण्याचे आव्हान असणार आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरुन 2100 करण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे तो निर्णय केव्हा पासून लागू होणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.5) तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे प्रमुख उपस्थित होते. याशिवाय, अनेक सेलिब्रिटींनीही यावेळी उपस्थिती लावली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांचा जल्लोष
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यानंतर नांदेडमध्ये भाजपा तर्फे शहरात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. तरोडा नाका आणि कौठा येथील बसवेश्रर पुतळा येथे फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या