छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता त्याचवेळी आपण एक पर्यायी उमेदवार तयार ठेवा अशी विनंती अंबादास दानवे यांना केली होती. आता पक्षाकडे विनंती करूनच अर्ज मागे घेतला अशी माहिती देवयानी डोनगावकरांचे (Devyani Dongaonkar) पती कृष्णा डोनगावकरांनी दिली. आपल्यावर दबाव टाकण्यासाठी भाजपने नोटीस पाठवल्याचा दावाही त्यांनी केला. देवयानी डोनगावकर या छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या (Chhatrapati Sambhajinagar Jalna Vidhan Parishad Election) ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने त्या ठिकाणी मविआला अपक्षाला पाठिंबा द्यावा लागला आहे. 

Continues below advertisement

विधान परिषदेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालनामधून ऐनवेळी ठाकरेंच्या अधिकृत उमेदवाराने माघारी घेतली. देवयानी डोनगावकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार होत्या. मात्र, त्याची कुणकुण आधीच लागल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश लोखंडे यांचा एक अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गणेश लोखंडे हे आता महाविकास आघाडीचे उमेदवार असतील.

Chhatrapati Sambhajinagar Election : ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस 

माध्यमांशी बोलताना कृष्णा डोनगावकर म्हणाले की, "आंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी माझ्या पत्नीचे फोटो मागितले, तेव्हाच एक पर्यायी उमेदवार तयार ठेवा असं त्यांना सांगितलं होतं. बिनविरोध निवडणूक होऊ नये म्हणून आमचे दोन उमेदवार होते. ही निवडणूक खर्चिक होती, लढण्यात काही फायदा नव्हता. या निवडणुकीचा निकाल आधीच लक्षात आला होता, काही जमणार नाही. यामध्ये शिंदे यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला, पण मदत मिळाली नाही."

Continues below advertisement

देवयानी डोनगावकरांचा अर्ज दाखल केल्यानंतर साखर कारखाना समिती बरखास्त करण्याची मला नोटीस मिळाली. भाजपने दबाव टाकण्यासाठी मला नोटीस पाठवली. मी त्या नोटिशीला घाबरत नाही. पण आहे ते घालवायचे नाही म्हणून माघार घेतोय. भाजपला कुणाला राहू द्यायचे आहे की नाही? मलाही नोटीस देऊन दमबाजी देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कृष्णा डोनगावकरांनी केला.

कृष्णा डोनगावकर म्हणाले की, "आमच्यासाठी जिल्हा बँक निवडणूक महत्वाची आहे. दोन्ही निवडणूक लढणे मला शक्य नव्हते. त्यामुळे पक्षाकडे विनंती करून उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपकडून मंत्री असलेला अतुल सावेंसारखा मोठा माणूस जिल्हा बँकेची निवडणूक लढवत आहे."

ही बातमी वाचा: