Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil, Nashik : "सगेसोयरेची अंमलबजावणी करा. अन्यथा तुमचा राजकीय सुपडा साफ करु. 48 पैकी एकही खासदार निवडून येणार नाही", असं आव्हान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. आता मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. "कोण जरांगे? कुठे कोणाला चॅलेंज करावं ? तेवढी त्याची पोहोच आहे का ? त्याचा राजकारणावर काही अभ्यास आहे का ? आरक्षणावरही अभ्यास आहे का ? की शिक्षण आहे?"असे सवाल छगन भुजबळ यांनी केले आहेत. शिवाय मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यात हवा गेली असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत.


गाढवाचे उदाहरण देऊन मनोज जरांगेंवर टीका 


छगन भुजबळ यांनी गाढवाचे उदाहरण देऊन मनोज जरांगे पाटलांवर टीका केलीये. "मी मागे एक गोष्ट सांगितली होती. पाण्याच्या टाकी खाली काही पोर उभी होती तिथं विचारल वर काय झालय. तर त्यांनी सांगितले गाढव टाकीच्या वर चढले आहे. त्याला खाली उतरायचे कसे हा विचार करतोय..तिथे गावातील एक पाटील आले ते म्हणाले गाढवाला खाली उतरायचे नंतर बघू पहिले त्याला वर कोणी चढवले ते अगोदर सांगा", अशी गोष्ट सांगून भुजबळ यांनी जरांगेवर निशाणा साधलाय. 


अशोक चव्हाण मनोज जरांगेंना का भेटले मला माहिती नाही


पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, अशोक चव्हाण मनोज जरांगेंना का भेटले मला माहिती नाही. कदाचित तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले असतील किंवा त्यांच्या घरातील कोणी उभे राहात असेल त्यासाठी गेले असतील. त्याबद्दल मला काही माहीत नाही. तसही कोणी कोणाला भेटावं त्याबद्दल आमचे काहीही म्हणणं नाही. एखादा माणसाला देव मानत असताना त्याच्यात क्वालिटी पण दिसली पाहिजे, असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं. 


इंडिया आघाडी एकत्र आलीये असं वाटत नाही 


वेगवेगळ्या नेत्यांची भाषण ऐकून लोक आपली मत ठरवतात. आपल्याला वाटतं इंडिया आघाडी एकत्र आलीय पण मला तसं वाटत नाही. बिहारमध्ये बघितलं नितेश कुमार भाजप सोबत गेले. बिजू जनता दल बघितलं काँग्रेस , आम आदमी पार्टी बघितली, सर्व मोठे पक्ष एकत्र आल्याचे सध्या तरी दिसत नाही, असही  छगन भुजबळ म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray : भाजप नावाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली, आता त्यांचा डोक्यात हवा गेली; उद्धव ठाकरेंचा घणाघात