Chhagan Bhujbal on Rohit Pawar: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी झालेला विमान अपघात (Ajit Pawar Death Plane Crash) हा वैमानिकाचा वापर करून घडवून आणलेला घातपात असू शकतो, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून सखोल चौकशी करावी, तसेच या प्रकरणाची फौजदारी तपासणीही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अपघातग्रस्त विमान चालवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या मालकांशी नागरी उड्डाण मंत्र्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे ‘मैत्रीपूर्ण’ संबंध असल्याने निष्पक्ष चौकशी होण्याबाबत रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली. आता रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकेवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Chhagan Bhujbal on Rohit Pawar: नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोणीही कितीही शंका निर्माण केल्या तरी माझे म्हणणे इतकेच आहे की ज्यांच्याकडे शंका, पुरावे असतील तर वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआयच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना सांगतो की, तुम्ही पण चौकशी करा. ज्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यांनी तपास यंत्रणा माहिती दिली पाहिजे. त्याच्यामध्ये चौकशी करून किती तथ्य त्याच्यामध्ये आहे ते समजेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Chhagan Bhujbal: जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई होईल

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यासंदर्भात जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. जय पवार यांनी विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत, असं म्हटलं आहे. याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही हे खरे आहे. स्फोट एवढे झाले, आगीचा प्रादुर्भाव एवढा होता की ते थोडसं खराब झालं असेल. अशा परिस्थितीत अमेरिकेत यंत्रणा आहे. ब्लॅकबॉक्समधील जे गूढ आहे ते ती यंत्रणा काढू शकते. आपण सगळ्या बाजूने प्रयत्न करू. राज्य व भारत सरकार या विषयात पूर्णपणे काळजी घेत आहे. कोणाच्या काही चुका आहे का? मुद्दामून कोणी काही केलं का? हा एक भाग आहे. दुसरा भाग म्हणजे पायलटने काही चूक केली का? विमानामध्ये रडारमध्ये काही चुका झाल्या या दोन्ही मार्गाने चौकशी होईल. जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

आणखी वाचा 

Rohit Pawar and Chhagan Bhujbal: अजितदादांना अमोल कोल्हेंना संयुक्त राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष करायचं होतं; रोहित पवारांच्या दाव्याची भुजबळांनी उडविली खिल्ली, म्हणाले...