मुंबई : मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी-फेसिंग व्ह्यू असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला (Ramtek Bungalow) होय. मात्र, याच रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडत असल्याचे समोर आले आहे. मंत्रिमंडळ (Minister) खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शासनाने रामटेक बंगला देण्यात आला. मात्र या रामटेक बंगल्याची बावनकुळेंकडून Chandrasekhar Bawankule) अदलाबदल करण्याची चर्चा सुरू आहे.
हा बंगला पंकजा मुंडे यांना देण्यात येणार असून बावनकुळे या बंगल्याची अदलाबदल करणार असल्याचे सांगितले जातं आहे. तर दुसरीकडे रामटेक बंगला घेण्याची मुंडेंचीही तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना रामटेक बंगल्यात वास्तव्यास होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी हा बंगल्यासंदर्भात होकार दर्शवला असल्याची चर्चा आहे.
रामटेक बंगल्याचा नेमका इतिहास काय?
दुसरीकडे याच रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडल्यानंतर अनेक मंत्री नाकं मुरडताना दिसताय. अशातच राजकीय वर्तुळात शुभ-अशुभाची चर्चाही रामटेक बंगल्याबाबत होताना दिसत आहे. यंदा हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना मिळाला आहे. दरम्यान, माजी मंत्री दीपक केसरकर, एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ यांचं वास्तव्य ह्याच बंगल्यात होतं. मात्र अलिकडे झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात तिन्ही नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळताना दिसलाय, त्यामुळे अनेक उलट सुलट अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच, पंकजा मुंडे हा बंगला स्वीकारतात का? हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
कोणत्या मंत्र्यांस कोणता बंगला?
निवासस्थान राम शिंदे, सभापती, विधान परिषद ज्ञानेश्वरी, राहुल नावेकर, अध्यक्ष विधानसभा शिवगिरी, चंद्रशेखर बावनकुळे रामटेक, राधाकृष्ण विखे-पाटील रॉयलस्टोन, हसन मुश्रीफ (क-८) विशाळगड, चंद्रकांतदादा पाटील ब-१ सिहगड, गिरीश महाजन सेवासदन, गुलाबराव पाटील जेतवन, गणेश नाईक ब-४ पावनगड , दादा भुसे ब-३ जंजीरा, संजय राठोड शिवनेरी, धनंजय मुंडे सातपुडा, मंगलप्रभात लोढा ब-५ विजयदुर्ग, उदय सामंत मुक्तागिरी, जयकुमार रावल चित्रकूट, पंकजा मुंडे पर्णकुटी, अतुल सावे अ-३ शिवगढ़, अशोक उईके अ-९ लोहगड, शंभूराजे देसाई मेघदूत, आशिष शेलार व-२ रत्नसिषु, दत्तात्रय भरणे ब-६ सिध्दगड, अदिती तटकरे अ-५ प्रतापगड, शिवेंद्रराजे भोसले ३-७ पन्हाळगड, माणिकराव कोकाटे अंबर-२७, जयकुमार गोरे क-६ प्रचितीगड, नरहरि झिरवाळ सुरुचि ०९, संजय सावकारे अंबर-३२, संजय शिरसाठ अंबर-३८, प्रताप सरनाईक अर्वतो-५, भरत गोगावले सुरुचि ०२, मकरंद पाटील सुरुचि-०३
हेही वाचा