Shivsena Uddhav Thackeray Camp Candidates list in Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रविवारी रात्रीपासून एबी फॉर्म वाटप करायला सुरुवात झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल रात्री अनेक उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून स्वत:च्या हाताने एबी फॉर्म (AB Form) वाटले. ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे अशा उमेदवारांना काल मातोश्री (Matoshree) इथे रात्री बोलवण्यात आले होते आणि त्यांच्या हातात एबी फॉर्म ठेवण्यात आले. काही जणांना काल रात्री एबी फॉर्म देण्यात आले आहेत, तर काही उमेदवारांना आज सकाळी 11 वाजल्यानंतर एबी फॉर्म दिले जातील. एबी फॉर्म देताना सुद्धा कोणाला एबी फॉर्म दिला याची प्रचंड गुप्तता पाळली जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची (Shivsena) पहिली उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळता यावी यासाठी उमेदवारांची यादी (Candidates list) जाहीर होण्याआधी एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्याचे सूचना या पक्षाकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणाकोणाला एबी फॉर्म देण्यात आले आणि कोण कोण ठाकरे यांच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असतील याची काही नावं समोर आली आहेत. (BMC Election 2026 Candidates list Latest news)

Continues below advertisement

BMC Election 2026: मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 28 चेहरे ठरले, कोणाकोणाला संधी मिळाली? 

प्रभाग क्रमांक ५४- अंकित प्रभू प्रभाग क्र. ५९-  शैलेश फणसे प्रभाग क्र. ६०- मेघना विशाल काकडे माने प्रभाग क्र. ६१  सेजल दयानंद सावंतप्रभाग क्र. ६२  झीशान चंगेज मुलतानी प्रभाग क्र. ६३  देवेंद्र (बाळा) आंबेरकर प्रभाग क्र. ६४  सबा हारून खानप्रभाग क्रमांक ४०- सुहास वाडकर प्रभाग क्रमांक २०६- सचिन पडवळ प्रभाग क्रमांक ९३-रोहिणी कांबळेप्रभाग क्र. १०० साधना वरस्कर प्रभाग क्र. १५६ संजना संतोष कासले   प्रभाग क्र. १६४ साईनाथ साधू कटके  प्रभाग क्र. १६८ सुधीर खातू वार्ड प्रभाग क्र. १२४ सकीना शेखप्रभाग क्र.१२७ स्वरूपा पाटील प्रभाग क्र- ८९ गितेश राऊत प्रभाग क्र- १४१- विठ्ठल लोकरे प्रभाग क्र - १४२- सुनंदा लोकरे  प्रभाग क्रमांक १३७- महादेव आंबेकरप्रभाग क्र-१३८- अर्जुन शिंदे  प्रभाग १६७ - सुवर्णा मोरे  प्रभाग १५०- सुप्रदा फातर्फेकर प्रभाग क्र ९५ - चंद्रशेखर वायंगणकर  प्रभाग क्र २१५- किरण बालसराफ प्रभाग क्र २१८- गीता अहिरेकर प्रभाग क्र २२२- संपत ठाकूर प्रभाग क्र २२५- अजिंक्य धात्रक

Continues below advertisement

आणखी वाचा

उद्धव ठाकरेंनी प्रत्येक उमेदवाराला भेटून एबी फॉर्म हातात ठेवला, मातोश्रीवर रात्री काय-काय घडलं?