BMC Election 2025 मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation Elections 2025) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर यंदा कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

अनेक माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश- (Eknath Shinde Shivsena Group)

आतापर्यंत अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात शीतल म्हात्रे, यशवंत जाधव, सुवर्णा कारंजे, परमेश्वर कदम, वैशाली शेवाळे, दिलीप लांडे, मानसी दळवी, किरण लांडगे, समाधान सरवणकर, अमेय घोले, संतोष खरात, दत्ता नरवणकर, सान्वी तांडेल, आत्माराम चाचे यांचाही समावेश आहे.

मुंबई महापालिकेत सद्यस्थितीत कोणाकडे किती माजी नगरसेवक? (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार अपक्ष नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर एकूण संख्या 88 नगरसेवकांची झाली. नंतर शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही संख्या 94 झाली. त्यानंतर जात पडताळणी आणि पोटनिवडणुकीमध्ये 2022 पर्यंत मुदत संपेपर्यंत शिवसेनेचे आणखी पाच नगरसेवक वाढले. शिवसेनेचा नगरसेवकांची संख्या 99 झाली. शिवसेनेमध्ये झालेला पक्ष फुटी नंतर एका मागे एक 2017 साली निवडून आलेले नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला लागले.सद्यस्थितीत एकूण 44 माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे तर 55 माजी नगरसेवक हे आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत.

Continues below advertisement

मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागाची प्रभाग रचना अंतिम- (Mumbai Municipal Corporation Elections 2025)

मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC Election 2025) प्रारूप प्रभाग रचना  प्रसिद्ध केल्यानंतर 494 हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. या सगळ्याचा विचार करून नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप प्रभाग रचना पाठवली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागाची प्रभाग रचना अंतिम करून त्याचा संपूर्ण आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार मुंबई महापालिकेची एकूण लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 337 असून ही लोकसंख्या मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांमध्ये विभागली गेली आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागासाठी आज आरक्षण सोडत जाहीर- (BMC Election Ward Reservation 2025)

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Mumbai Muncipal Corporation Election 2025: BMC निवडणुकीकडे देशाचं लक्ष; 2017 मध्ये कोण-कोण विजयी?; मुंबईतील 227 नगरसेवकांची यादी!

Raj Thackeray On BMC Election 2025: 227 पैकी 125 जागांवर मनसेची ताकद, मेरीटनूसार जागावाटप; मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी