West Bengal Assam Election Result : पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला असून त्यातून एक महत्त्वाचा ट्रेंड समोर आला आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आरक्षित जागांवर भाजप आणि एनडीएने उल्लेखनीय कामगिरी करत आपला प्रभाव अधिक मजबूत केला आहे. या निकालामुळे सामाजिक समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत.

Continues below advertisement

पश्चिम बंगालमध्ये भाजपने अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या बहुतांश जागांवर विजय मिळवला आहे. तसेच अनुसूचित जमातींसाठी राखीव सर्व जागांवरही भाजपने बाजी मारत एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Bengal SC ST Seats : आरक्षित जागांवर भाजपचं वर्चस्व

पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जातींसाठी असलेल्या 68 जागांपैकी तब्बल 51 जागांवर भाजपने विजय मिळवला. तर अनुसूचित जमातींच्या 16 पैकी सर्व जागा भाजपच्या खात्यात गेल्या. एकूण 84 SC/ST जागांपैकी 67 जागांवर विजय मिळवत भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसला या जागांवर मोठा फटका बसला असून त्यांना केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

Continues below advertisement

Assam SC ST Seats : एनडीएची मजबूत पकड

आसाममध्येही भाजप आणि एनडीएने आरक्षित जागांवर प्रभावी कामगिरी केली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव 9 जागांपैकी भाजपने 5 जागा जिंकल्या, तर एनडीएने मिळून 8 जागांवर विजय मिळवला. अनुसूचित जमातींसाठी राखीव 19 जागांपैकी भाजपने 13 जागा जिंकल्या असून एनडीएने सर्व 19 जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये सहयोगी पक्षांचाही मोठा वाटा आहे.

Political Impact : सामाजिक समीकरणांमध्ये बदल

राजकीय विश्लेषकांच्या मते, या निकालांमुळे अनुसूचित जाती आणि जमातींचा कल भाजपकडे झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. आरक्षित मतदारसंघ आता एनडीएसाठी मजबूत आधार बनत असल्याचे चित्र दिसत आहे. या निकालामागे परिसीमनाचाही मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. आसाममध्ये आरक्षित जागांची संख्या वाढल्याने भाजपला फायदा झाला आहे.

Tamil Nadu Puducherry : सहयोगी पक्षांचीही कामगिरी

तामिळनाडूमध्ये एनडीएच्या सहयोगी पक्षांनीही आरक्षित जागांवर चांगली कामगिरी केली आहे. एआयएडीएमकेने अनुसूचित जातींच्या 46 पैकी 9 जागा जिंकल्या, तर अनुसूचित जमातींच्या 2 पैकी 1 जागा जिंकली. पुडुचेरीमध्ये एनडीएच्या सहयोगी पक्षाने अनुसूचित जातींसाठी राखीव जागांपैकी 2 जागांवर विजय मिळवला आहे. या सर्व निकालांमुळे भाजप आणि एनडीएने सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या मतदारांमध्ये आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही बातमी वाचा: