BJP MLA Nitesh Rane on Shiv Sena Thackeray Group: वापरा आणि फेका हीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नीती, असं म्हणत भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी डिसेंबर अधिवेशनाआधी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता बदलेल, असा दावा केला आहे. तसेच, सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) ओढण्याता आलेल्या ताशेऱ्यांवर बोलताना संजय राऊतांनी आपल्या मालकाच्या भाच्याला विचारावं, समृद्धी वरच्या फूड प्लाझाचं काम मलाच हवं, ब्लॅकमेलिंग कोण करत होतं, असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरेंवर खळबळजनक आरोपही केला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि समादवादी पक्षाच्या युतीवरही नितेश राणेंनी भाष्य केलं असून उद्धव ठाकरेंनी आता पॉप्युलर प्रिंट ऑफ इंडिया, आयसीस, रझा अकादमी आणि एमआयएमसोबतही युती करावी असं टीकास्त्रही नितेश राणेंनी डागलं आहे. 


भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना सांगीन आता तुम्ही समाजवादी विचार स्विकारलाच आहात. काल (रविवारी) संजय राऊतांनी भाषणात सांगून टाकलंय, हिंदुत्वाच्या विचारांपेक्षा समाजवादी विचार हे जास्त प्रभावी आहेत. मग उद्धव ठाकरेंनी आता पॉप्युलर प्रिंट ऑफ इंडियाशी बोलावं, आयसीसशी बोलावं, रझा अकादमी आणि एमआयएमसोबतही बोलावं आणि त्यांच्यासोबतही युती करुन टाका, त्यांना कशाला सोडताय. तसंही देशाच्या आणि राष्ट्राच्या जेजे विरोधात आहेत, त्या सगळ्यांच्या विरोधात युती करण्याचा चंगच उद्धव ठाकरेंनी बांधला आहे. आणि वैयक्तिक संबंध म्हटलं तर, तुमच्या मुलाचे आणि इम्तियाज जलिल यांच्या मुलाची चांगली मैत्री आहे, असं आम्ही ऐकून आहोत, मग MIM शी युती करण्यास काहीच हरकत नाही."


"ज्या समाजवादी विचाराच्या विरोधात बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण आपला राजकीय प्रवास आणि इतिहास मुंबई, महाराष्ट्रात घडवला आणि मराठी माणसाला मान सन्मान मिळवून दिला. त्याच समाजवादी विचारसरणीच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही बसणार असाल, तर तुमच्यासारखा मुलगा आणि सुपुत्र या इतिहासात होऊ शकत नाही हे मी सांगतो.", असं नितेश राणे म्हणाले आहेत. 


राऊतांनी आपल्या मालकाच्या भाच्याला विचारावं, समृद्धी वरच्या फूड प्लाझाचं काम मलाच हवं, ब्लॅकमेलिंग कोण करत होतं : नितेश राणे 


समृद्धी महामार्गावर काल भीषण अपघात झाला. आज शिवसेनेचं (ठाकरे गटाचं मुखपत्र) मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून समृद्धी महामार्गावर टीका करण्यात आली आहे. त्यावर बोलताना नितेश राणेंनी सामना अग्रलेखावर जोरदार हल्ला चढवला आहे. नितेश राणे म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गावर टीका टिपणी करणारा अग्रलेख सामनात अग्रलेख लिहिला आहे. संजय राजाराम राऊत यांना आठवण करून देईल, जरा आपल्या मालकाच्या सरदेसाई नावाच्या भाच्याला विचार, हा समृद्धी महामार्ग बनत असताना त्यावरील फूड प्लाझा तयार होणार आहेत, त्याचं कंत्राट मलाच हवं आहे, असं ब्लॅकमेलिंग कोण करत होतं? मग तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे या मुद्द्यावर कदाचित यावर जास्त प्रकाश टाकू शकतील."


"महामार्ग बनताना त्याची काम कंत्राट आणि फूड प्लाझाचं काम पाहिजे, त्यातून खोके मिळतात का? हे पाहायचंय आणि रस्ते बनल्यानंतर शिव्या शाप द्यायचे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि आमच्या सरकारवर टीका करण्यापेक्षा सरकारी भाच्याला विचार समृद्धी हायवेमुळे त्याच्या आयुष्यात किती समृद्धी आली आणि यावर एक अग्रलेख लिहा.", असंही नितेश राणे म्हणाले आहेत. 


डिसेंबर अधिवेशनाआधी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता बदलेल : नितेश राणे 


नितेश राणे बोलताना म्हणाले की, "मी वारंवार सांगतोय, डिसेंबर अधिवेशनाआधी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता बदलणार आहे. वांद्रे येथील कलानगरचा बोका हा मातोश्रीवर एवढा दबाव आणतोय की, त्याचं प्रतिबिंब आज उबाठाच्या नेत्यांच्या यादीत दिसून आलं आहे. विरोधी पक्ष नेते विधानपरिषद अंबादास दानवे यांना साधं उपनेते किंवा नेताही उद्धव ठाकरेंनी बनवलं नाही. जे अंबादास दानवे आज महाराष्ट्रात फिरून आमच्या सरकारवर टीका करत आहेत, त्यांचं त्यांच्याच पक्षात काय स्थान आहे? हे स्पष्ट झालं आहे, म्हणून अंबादास दानवे यांना सांगेल, यालाच उद्धव ठाकरे म्हणतात, वापरा आणि फेका हीच उद्धव ठाकरेंची नीती आहे, पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे."