Sanjay Raut and Vinod Ghosalkar: नवऱ्याची हत्या, भाजप-शिंदेंकडून पक्षप्रवेशासाठी दबाव, राऊतांचा आरोप, शेजारी उभ्या विनोद घोसाळकरांचे डोळे पाणावले

Shind Camp Vs Thackeray Camp: तेजस्विनी घोसाळकरांवर शिंदे गट-भाजपच्या दबावाचा आरोप. संजय राऊतांच्या शेजारी उभ्या असणाऱ्या विनोद घोसाळकरांचे डोळे पाणावले

Continues below advertisement

Tejasvee Ghosalkar: ठाकरे गटाच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना गळाला लावण्यासाठी सध्या शिंदे गट आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट (Shinde Camp) आणि भाजपकडून (BJP) जास्तीत जास्त माजी नगरसेवक आपल्या गोटात घेण्यासाठी जोरदार मोहीम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. त्यानंतर विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरही गेले.

Continues below advertisement

तत्पूर्वी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विनोद घोसाळकर हे त्यांच्या शेजारीच उभे होते. तेव्हा प्रसारमाध्यमांनी घोसाळकर यांना तुम्ही शिंदे गटात जाणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर विनोद घोसाळकर यांनी मी अजूनही शिवसेनेतच असल्याचे सांगितले. त्यानंतर राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आताच त्यांची (विनोद घोसाळकर) आणि माझी चर्चा झाली. विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक आणि आता उपनेते आहेत. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाचा एक दुर्दैवी प्रसंग झाला त्यांच्या सूनबाई शिवसेनेतून नगरसेविका होत्या. खरं म्हणजे मला लाज वाटते भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटातून या परिस्थितीतही, दोन पक्षाचे प्रमुख लोक त्या मुलीला फोन करून, 'आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात या', असे सांगत आहेत. त्यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

एका घरात तिने आपला पती गमावला आणि यांनी आपला मुलगा गमावला. त्या घरात तुम्ही असे कृत्य करत आहात. लाजा वाटल्या पाहिजेत, निर्दयी लोक आहेत. आमचा विषय आम्ही बघू. ते पक्षात आहेत पक्षाबरोबर आहेत आणि त्यांची सूनबाई सुद्धा पक्षात आहे, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. यावर आता शिंदे गट आणि भाजपचे नेते काय स्पष्टीकरण आणि प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; पक्ष सोडणार का, नाराज दूर झाली का? स्पष्टच शब्दात सांगितलं

मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; तेजस्वी घोसळकरांचा राजीनामा, पक्षाकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू, डॅमेज कंट्रोल रोखणार?

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola