Betting Market Predictions on Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. आतापर्यंत 6 टप्प्यातील मतनाद पार पडलेय. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी सट्टा बाजार तेजीत आहे. विविध जागांचा अन् राज्यातील निकालाचा अंदाज वर्तवला जातोय. राजकीय विश्लेषकांच्या मते, काही राज्यातील निकाल धक्कादायक ठरु शकतो. 2019 च्या तुलनेत काही राज्यामध्ये वेगळा निकाल पाहायला मिळू शकतो. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेस असल्याचं दिसतेय. 


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्षामध्ये लोकसभा निवडणुकीआधी उभी फूट पडली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना वेगळा पक्ष मिळाला, ते महाविकास आघाडी म्हणून काँग्रेससोबत मैदानात उतरले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपसोबत महायुतीमध्ये होते.  महाराष्ट्रामध्ये NDA आणि INDIA आघाडीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळालाय. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान झालं. 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया संपली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालात मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्रात NDA की INDIA कोण वरचढ ठरणार? याबाबत चर्चा सुरु आहे. सट्टा बाजारातही याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. पाहूयात सट्टा बाजारात कुणाला किती जागा दिल्या आहेत.  


महाराष्ट्रात NDA ला मोठं नुकसान, INDIA आघाडीला फायदा 


सट्टा बाजाराच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजप NDA युतीला 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत एनडीएला 42 जागांवर विजय मिळला होता. जर यावेळी भाजपला 28 जागा मिळाल्या तर तब्बल 14 जागांवर नुकसान होत असल्याचं दिसत आहे. एनडीएच्या जागा कमी झाल्याचा फायदा काँग्रेस अन् महाविकास आघाडीला होत असल्याचं दिसतेय. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला फक्त सहा जागा मिळाल्या आहेत. यावेळी त्यांना 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रातील प्रमुख जागांवरील अंदाज काय ? 


बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमनेसामने होत्या. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय होऊ शकतो. 


नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला विजय मिळण्याचा अंदाज आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात आहेत.


यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेना जिंकण्याचा अंदाज आहे. संजय देशमुख येथून निवडणूक लढवत आहेत. 


अमरावतीमध्ये काँग्रेसच्या बलवंत वानखेडेंचा विजय होईल, भाजपच्या नवनीत राणाचा पराभव होईल, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. 


मुंबई उत्तर मतदारसंघातून भाजपचे पियूष गोयल तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडणूक येतील, असा अंदाज आहे.


कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचे शाहू महाराज निवडून येतील, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे.