Raigad: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री भरत गोगावले सध्या अघोरी पूजेच्या व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत . पालघरचे पालकमंत्री होण्यासाठी आघोरी पूजा केल्याचा दावा केला जात असताना महायुतीतीलच अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी शेअर केलेल्या सोशल मीडियावरील व्हिडिओवरून निवडणुकीपूर्वी भरत गोगावल्यांनी घरी आघोरी पूजा करून घेतली असा दावा करण्यात आला आहे .यावर राज्यमंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे .

काय म्हणाले भरत गोगावले ?

'अघोरी विद्येला आम्ही मानत नाही .जे नशिबात होतं तेच होतं .त्यामुळे आम्ही अघोरी विद्या करून मोठे झालो असतो तरी याआधी अशा वविद्या करून कधीच पालकमंत्री झालो असतो .माझ्या घरी आलेले साधू महाराज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात .मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सर्वांचा आशीर्वाद घेत असतो .आम्हाला खरोखर अघोरी विद्या करायची असती तर असे व्हिडिओ काढून टाकले नसते .आम्ही हिंदुत्व आणि देवधर्म करणारे आहोत .ज्यांना माझे हे प्रकार अघोरी वाटतात त्यांना वाटू द्या .आम्ही असलं अघोरी काही करत नाही .पालकमंत्री पदासाठी वेठीस धरण्यासाठी राष्ट्रवादीचा हा डाव' असल्याचंही मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता .त्या व्हिडिओसोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता .त्यानंतर आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय .यात महायुतीतील सहकारी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता .निवडणुकीपूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी घरी अघोरी पूजा करून घेतली असा दावा सुरज चव्हाण यांनी केलाय . यात भरत गोगावलेंनी व्हिडिओ पोस्ट करत सुरज चव्हाण यांनी भरत शेठ आणि अघोरी विद्या म्हणजे पालकमंत्री का ?असा सवाल केला होता .यावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे .

सुरज चव्हाण म्हणाले होते...

या प्रकरणी बोलताना सूरज चव्हाण म्हणाले, काल मला सूत्रांच्या आधारे एक व्हिडिओ मिळाला. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून बाबा बुवा यांच्याकडून पुजा करून घेत आहे. वसंत मोरे यांनीही एक व्हिडिओ दाखवला होता. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये. एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालायला हवे. पालकमंत्रीपदासाठी अशा प्रकारच्या पुजेचा घाट घालणं चुकीचा आहे. भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडून याची दखल घ्यायला हवी त्यांनी दखल न घेतल्यास आम्ही निर्णय घेऊ असंही पुढे सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:

तुम्हाला लंगोट घालायला कोणी शिकवली? वस्ताद एक डाव राखून ठेवतो, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचा इशारा