पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे, अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाने विधानसभेची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. स्वतः पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरुन दौरे सुरू केले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत, यादरम्यान अनेक उमेदवारांनी उपस्थिती लावली आहे. दरम्यान काल इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिलेल्या आमदार संदिप क्षीरसागर यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे.
काल बीडसाठी आमदार संदिप क्षीरसागर यांच्या व्यतिरिक्त 8 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज आमदार क्षीरसागर पवारांच्या भेटीला आले आहेत. शरद पवार यांनी आमदार संदिप क्षीरसागर यांना लंच टाईम मध्ये भेट दिली. या भेटीदरम्यान, उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, मतदारसंघातील काही कामांबाबत पवारांशी बोलायचे होते म्हणून आलो होतो. बीडमधून माझ्या नावाला कोणाचाही विरोध नाही, आमदारकी देखील मीच पुन्हा लढणार आहे, असं ते म्हणाले.
नाराज आमदार संदिप क्षीरसागर यांना पवारांनी अखेर लंच टाईमात भेट दिली. या भेटीदरम्यान, उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, मतदारसंघातील काही कामांबाबत पवारांशी (Sharad Pawar) बोलायचे होते म्हणून आलो होतो. बीडमधून माझ्या नावाला कोणाचाही विरोध नाही, आमदारकी देखील मीच पुन्हा लढणार आहे, असं ते यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. तर काल बीडसाठी आमदार संदिप क्षीरसागर यांच्या व्यतिरिक्त 8 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार क्षीरसागर पवारांच्या भेटीला आले आहेत.
पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात विदर्भातील 12 जिल्ह्यातल्या मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती आज पार पडणार आहेत. आज दिवसभर शरद पवार इच्छुकांची मुलाखत घेणार आहेत. या आधी त्यांच्या निवासस्थानी मोदीबागेत देखील इच्छुकांनी भेट घेत आहेत.राज्यभरातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार या मुलाखतीसाठी उपस्थित आहेत.
आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला
इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला आले होते. तर त्यांच्यावरील क्रॉस व्होटिंगचा आरोप चुकीचा असल्याचा शरद पवारांना सांगणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. माझ्यावरील आरोप सर्व चुकीचे आहेत, काँग्रेसकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर मतदारसंघातील कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.