Beed News : बीड नगरपालिकेसाठी आजपासून भाजपने प्रचाराला सुरुवात केलीय. भाजप नेते योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी होत आहेत. बीड नगरपालिकेत भाजप (BJP) विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी (NCP) आणि एमआयएममध्ये (MIM) लढत होणार आहे. अशातच भाजपमध्ये गेल्यानंतर मला मोकळीक वाटते, माझी अडचण इतरांना झाली होती. त्यामुळे त्यांना देखील आता मोकळीक वाटत असेल, असा खोचक टोला बीडचे राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचे बंधू योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांनी केलीय. अजित पवार यांची साथ सोडल्यानंतर योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित ( MLA Vijaysinh Pandit) यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीय.
Sandeep Kshirsagar : बीड बाबतीत त्यांनी चिंता करू नये, आम्ही सक्षम आहोत
दरम्यान, अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्ष पद आरक्षित आहे. आम्ही चांगल्या उमेदवाराला संधी दिली. इतर पक्षांनी जात आणि धर्म बघून उमेदवार दिले आहेत. मात्र आम्ही सर्व समावेशक चेहरे दिले आहेत. कोण काय टोमणे मारतो त्याकडे आम्ही पाहत नाही. बालक पालक पापडी मुरुकुल यात त्यांनी पडू नये. विकासावर बोलावं. यांना बीडचं काहीही माहित नाही. चार गल्ल्या देखील माहित नाहीत. बीड बाबतीत त्यांनी चिंता करू नये, आम्ही सक्षम आहोत. असेही योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) म्हणाले. तर गेवराईचे पार्सल तीन तारखेला गेवराईला पाठवले जाईल, असे म्हणत योगेश क्षीरसागर यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर थेट निशाणा साधला.
Beed : प्रभागात रस्ता मंजूर होऊन देखील प्रश्न मार्गी लागत नाही, मतदारांचा थेट मतदानावर बहिष्कार
बीड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 आणि 18 मधील मतदारांनी नगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे. 2017 साली शहरातील राष्ट्रवादी भवन ते लेंडी नाला हा रस्ता मंजूर झालाय. वारंवार पाठपुरवठा करून देखील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने या प्रभागातील मतदारांनी नगरपालिकेच्या मतदानावरच बहिष्कार टाकला आहे. बहिष्कार टाकल्याचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान आता या मतदारांची मनधरणी पक्ष उमेदवार कशी करतात हे पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या