सिंधुदुर्ग : लोकसभेच्या निवडणुकीनंतर सिंधुदुर्गात भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) कुरबूर सुरू झाली आहे. आता या जिल्ह्यात या दोन्ही पक्षांमध्ये बॅनरवॉर रंगलंय. 15 जून रोजी कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी शिंदे यांच्या शिवसेनेने 'वक्त आने दो ...जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे' अशा आशयाचा बॅनर लावला होता. या बॅनरवर शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांचा फोटोदेखील होता. हेच बॅनरवॉर आता उदय सामंत (Uday Samant) यांच्या रत्नागिरीतील पाली या गावात पोहोचले आहे.
बाप बाप होता है
सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतही बॅनर वॉर चालू झाले आहे. हे युद्ध आता थेट उदय सामंत यांच्या पाली गावापर्यंत पोहोचले आहे. या गावात भाजपचे एक बॅनर लागले आहे. 'बाप बाप होता है. झुंड मे तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है,' अशा आशयाचे बॅनर या भागात लावण्यात आले आहे. कणकवलीतल्या शिंदे गटाच्या बॅनरला उत्तर म्हणून हे बॅनर लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे. कोकणात सध्या महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष चालू आहे. याच संघर्षातून हे बॅनरबाजीचे वॉर चालू झाले आहे. पाली गावात लावण्यात आलेल्या या बॅनरवर नारायण राणे यांचा फोटो आहे. तसेच मागे वाघाचेही चित्र आहे.
नितेश राणेंच्या समर्थकाकंडूनही बॅनरबाजी
कणकवली येथील बॅनरनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. सामंत बंधूंनीच हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न केलाय, असी चर्चा येथे रंगली होती. शिवसेनेच्या या बॅनरनंतर कणकवलीतही एक एक बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर नितेश राणेंचा फोटो होता. 'हमारा वक्त आया है, तुम्हारा वक्त आने नहीं देंगे. तुम्हारे ही इलाके में आके तुम्हे ही जबाब देंगे', असं या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं.
उदय सामंत यांचे समर्थक काय उत्तर देणार?
दरम्यान, कणकवली येथील शिवसेनेच्या बॅनरनंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली होती. काही उत्साही कार्यकर्त्यांनी हा बॅनर लावला आहे, असे सामंत म्हणाले होते. पण पाली येथील बॅनरमुळे आता शिवसेनेचे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :